आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडर स्फोटात दोघी भाजल्या, राधानगर परिसरातील रहिवाशांमध्ये खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील गाडगेनगर परिसरातील राधानगरमध्ये शिक्षणासाठी भाड्याने राहणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या खोलीत गॅस सिलिंडरचा मंगळवारी (दि. १०) सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने २२ वर्षीय दोन विद्यार्थिनी भाजल्याने जखमी झाल्या. दोघींवरही इर्विनमध्ये उपचार सुरू आहे. सिलींडरच्या स्फोटमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

रिना अशोकराव ठाकरे (२२) आणि पूनम भैय्यासाहेब विधळे (२२ ,दोघीही रा. रामा साऊर ह. मु. संजीवनी कॉलनी, राधानगर) असे जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. त्या श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत.राधानगरचाच भाग असलेल्या संजीवनी कॉलनीमधील झामरे यांच्या घरात वरच्या माळ्यावर एका खोलीत त्या भाड्याने राहतात. दरम्यान मंगळवारी त्यांच्या खोलीत असलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यावेळी रिना पूनम दोघीही खोलीत असल्यामुळे दोघींनाही आगीची झळ पोहोचली.
 
स्फोट होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने झामरे यांच्या घरात धाव घेतली, दोघींनाही विझवून तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केलेे. तसेच नागरिकांनी गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. यामध्ये रिना ३१ टक्के तर पुनम ४० टक्के भाजली असल्याचे समजते. माहिती मिळताच उपनिरीक्षक बळीराम राठोड पथकासह घटनास्थळी पोहचले होते. 

गाडगेनगर, राधानगर, संजीवनी कॉलनी या गजबजलेल्या परिसरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. आग लवकरच आटोक्यात आली नसती तर यापेक्षाही अधिक हानी झाली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.