आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात लवकरच होणार दोन सायबर पोलिस ठाणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - माहिती तंत्रज्ञानाचे जाळे फोफावत असताना या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापरही दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वीही ऑनलाइन बँकीगमध्ये फसगत, एटीएमचा पिन विचारून फसवणूक अशा पद्धातीने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. यातच आता केंद्र्र शासनाने व्यवहारासाठी कॅशलेस धोरण अंगिकारल्याने आॅनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक नागरिकांची या माध्यमातून फसवणूक होऊ नये किंवा झाल्यास त्याचा तातडीने छडा लागावा, यासाठी पोलिस विभागाने पूर्वी असलेल्या सायबर लॅबला अधिक सुसज्ज करून त्याला पोलिस ठाण्यांमध्ये बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमरावती शहर ग्रामीण या दोन ठिकाणी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माहिती तंत्रज्ञानाची जशी जशी प्रगती होत गेली, त्याच प्रमाणे सायबर क्राईमही वाढले. सुरूवातीला सायबर क्राईमचे प्रमाण कमी होते मात्र दिवसेदिवंस ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियावरून बदनामी कारक मजकूर, चित्रफित किंवा छायाचित्र प्रसारीत करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारही मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनीसुध्दा सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. मात्र वर्षभरापुर्वी ही यंत्रणा फारशी परिपूर्ण नव्हती. सहा महिन्यांपूर्वी शासनाने राज्यातील प्रत्येक पोलिस घटकाला (सर्व पोलिस आयुक्तालयात पोलिस अधीक्षकांच्या अधीनस्थ) सायबर लॅबमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचे महागडे उपकरण पुरवण्यात आले. त्यासाठी वातानुकुलित अशी कायमस्वरुपी जागा पुरवण्यात आली. एकंदरित सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र या सुविधांचा उपयोग करून सायबर क्राईमला पूर्णपणे आळा बसवण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. महागडे सायबर क्राईम उघड करण्यासाठी महत्वाचे असे उपकरण पुरवल्यानंतर १५ ऑगस्ट २०१६ पासून संपूर्ण राज्यात या सायबर लॅब कार्यान्वित झालेल्या आहेत. पुढील काळात याच सायबर लॅबचा पूर्ण ताकदीनिशी उपयोग करून साबर क्राईम रोखण्यात पोलिसांना यश यावे यासाठी सायबर लॅबच्याच ठिकाणी सायबर पोलिस ठाणे सुरू केले जाणार आहेत.

अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती पोलिस आयुक्तालयासाठी तसेच अमरावती ग्रामीणसाठी स्वतंत्र असे दोन सायबर पोलिस ठाणे राहणार आहे. ज्या प्रमाणे इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची व्यवस्था, स्टेशन डायरी ती सर्व सुविधा सायबर पोलिस ठाण्यात राहणार आहे. तसेच या पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र पोलिस निरीक्षक, स्वतंत्र मनुष्यबळ देण्यात येणार आहे.

पोलिस ठाणे होणार कार्यान्वित
^सद्या अस्तित्वात असलेल्या सायबर लॅबला सायबर पोलिस ठाणे म्हणून दर्जा देण्यात आला आहे. याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. एपीआयकाचंन पांडे, प्रमुख सायबर लॅब, अमरावती पोलिस आयुक्तालय.

आयटीसंबंधीचे सर्व गुन्हे सायबर ठाण्यात
सायबर पोलिस ठाण्यात माहीती तंत्रज्ञान कायदाचे उल्लघन करणारे सर्व गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये नेट बँकीगव्दारे झालेली फसवणूक, वेबसाईट हॅकींगचे प्रकार, विवीध सोशय मिडीयाव्दारे होणारी बदनामी यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश होतो.

सायबर ठाण्यात वर्ग केली जाणार तक्रार
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सायबर क्राईम ग्रामीण पोलिसांच्या सायबर ठाण्यात तर शहरातील सर्व सायबर क्राईमचे गुन्हे आयुक्तालयाच्या सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणार आहे. सायबर क्राईम घडल्यानंतर संबधित व्यक्तीने नजीकच्या ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर आवश्यक प्रक्रिया करून सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करावी लागणार आहे. त्यानंतर सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...