आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली; दोन जण ठार, यवतमाळ येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- भरधाव दुचाकीची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक बसल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ- नागपूर मार्गावरील आरटोओ कार्यालयासमोर दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आश्विन बेवनीया आणि राहुल उर्फ गोलू तांबे असे मृतकाचे नाव आहे.
या प्रकरणी चंदु मनोहर चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटे आश्विन आणि राहुल हे दोघेही कोटेश्वर येथून यवतमाळकडे दुचाकी क्रमांक एमएच-२९-एएक्स-४७४४ ने घरी येत होते. दरम्यान यवतमाळ नागपूर मार्गावरील आरटीओ कार्यालयासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एमएच-३१-एपी-७४६८ ला दुचाकीची जबर धडक बसली. या अपघातात दुचाकी चकनाचूर झाली असून आश्विन बेवनीया आणि राहुल उर्फ गोलू तांबे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...