आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या कारला अपघात,दोन जण ठार, अकोला- अमरावती मार्गावरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शेगाववरून नागपूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अकोला- अमरावती मार्गावरील हिवरा गावाजवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. ३१) रात्री १० वाजताच्या सुमारास घडला.सुजीत बंडुजी राजनकर (४५) आणि गोपाल शांतीलाल टावरी (३२, दोघेही रा. धंतोली, नागपूर) असे मृतकांची नावे आहेत.
याचवेळी नागपूर येथीलच कमल हसीजा यांच्यासह अन्य दोघे असे एकूण तिघे जण अपघातात जखमी झाले. हे पाच जण नागपुरातील रहिवासी असून, रविवारी रात्री शेगाववरून फोर्ड इको स्पार्ट कारने (एम. एच. २७ एआर ५१९७) नागपूरला जात होते. दरम्यान, नागझिरी चेकपॉइंटच्या पलीकडे असलेल्या हिवरा गावच्या शिवारात चालकाचे कारवरून नियंत्रण सुटले आणि कारने जवळपास चार ते पाच पलटी घेतल्या. यामुळे कारमध्ये बसलेले पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती लोणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात पाठवले. यावेळी उपचारादरम्यान सुजीत राजनकर गोपाल टावरी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक शहरात येऊन जखमींना उपचारासाठी नागपूरला घेऊन गेले.इर्विनमध्ये विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
तीन जखमींना नागपुरात हलवले
रविवारी रात्री हिवरा शिवारात कार उलटल्यामुळे अपघात होऊन नागपुरातील दोघांचा मृत्यू झाला.उर्वरीत तीन जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी नागपुरात हलवले आहे. प्रथमदर्शनी या कारची गती सुसाट असल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. पुढील तपास सुरू आहे. विशालखलसे, ठाणेदार, लोणी.
बातम्या आणखी आहेत...