आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत वीज पडून दोघांचा जागीच मृत्यू, शुक्रवारी रात्री काळाचा घाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुऱ्हा/ मोर्शी- नातेवाईकांसहमासेमारीसाठी तलावावर गेलेल्या एका २६ वर्षीय युवकाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना येथून सहा किमी. अंतरावर असलेल्या भिवापूर तलाव परिसरात शनिवारी (दि. ९) पहाटे तीनच्या सुमारास घडली. या घटनेत मंगेश रामदास मारबते या युवकाचा मृत्यू झाला. मोर्शीवरून अमरावतीच्या दिशेने जात असताना मडघे मंगल कार्यालयासमोर शनिवारी (दि. ८) रात्री नऊ वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने बडनेरा येथील प्रोफेसर काॅलनीमधील रहिवासी राजकुमार नामदेव कडू (५०) यांचा मृत्यू झाला. कडू दुचाकीने मोर्शीवरून अमरावतीकडे जात होते. 

 सुमारास मृत मंगेश हा नातेवाईक श्रीराम मारबते, प्रदीप मेश्राम, स्वप्नील मेश्राम, अरुण मेश्राम यांच्यासह तलावावर मासेमारीसाठी गेला होता. त्यांनी तलावात जाळे टाकले होते. मात्र, शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. पावसासह विजांच्या कडककडाटाला सुरुवात झाल्याने मंगेशसोबत असलेले त्याचे नातेवाईक तलावाच्या काठावर आले. मंगेशही त्यांच्या मागोमाग तलावातून बाहेर येत असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तलावाच्या काठावर ठेवले. दरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास मृतक मंगेशच्या वडिलांनी कुऱ्हा पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल सुभाष अढाऊ, हनुमंतसिंग ठाकूर, नितीन गेडाम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली घटनेचा पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील किणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...