आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशांच्या हल्ल्यात माय-लेकांचा मृत्यू, तलावात बुडाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- मधमाशांनी केलेल्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेल्या मायलेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळंब तालुक्यातील नांझा येथे घडली. कांताबाई किसन मसराम वय ५५ वर्षे श्याम किसन मसराम वय ३५ वर्षे अशी मृतांची नावे आहेत. याच हल्ल्यात रामभाऊ देवबा मसराम वय ५० वर्षे हे जखमी झाले.

या प्रकरणी सविस्तर असे की, वरील तीघेे शेतात खत देत होते. त्याचवेळी मधमाशांचा घोळका शेतात शिरला. तिघांवरही त्यांनी हल्ला चढवला. यातून सुटका करण्यासाठी रामभाऊ हा दूरवर जावून थांबला. मात्र कांताबाई आणि श्याम या दोघांनी शेतालगतच असलेल्या तलावात उडी घेतली. मात्र ते दोघेही तलावातील गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शेतात खत देत असताना सकाळी दुसरीकडून उडत आलेल्या मधमाशांनी तिघांवरही अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी कांताबाई श्याम मसराम यांनी तलावात उडी घेतली. तलावातील पाण्यात बुडाल्यानंतरही मधमाशांनी हल्ला सुरूच ठेवला. त्यामुळे मायलेकाचा पाण्यात अंत झाला. रामभाऊ मसराम यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. परंतू तेही जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...