आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Naxals Arrested In Gadchiroli, Another Two Surrender

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांना अटक; अन्‍य दोन शरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - आठ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. त्याव्यतिरिक्त शनिवारी दोन जहाल नक्षल्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. संजय उर्फ शंकर मंगू आतला (वय, २३, रा. पेठा, एटापल्ली) आणि रम्मी उर्फ शांताबाई धोबीराम हलामी (२२, रा. कोसमी, धानोरा) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे आहेत.
गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर गडचिरोलीतील पेठा, हालेवारा जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवत असताना कंपनी १० चा सदस्य संजय आतला आणि टिपागड दलम सदस्य रम्मी हलामी यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
तर दुसरीकडे सात क्रमांकाच्या प्लाटूनचा सदस्य साईनाथ उर्फ राकेश कटीया पदा ( २२, रा. कुंजेमरका, एटापल्ली) आणि प्लाटून चौदाची सदस्य अरुणा उर्फ रुकमा केहका नरोटे (२२, रा. झारेवाडा, एटापल्ली) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांची कारवाई आणि नक्षली आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचा दावा गडचिरोली पोलिसांनी केला आहे.