आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्रेडलिंक्स' प्रकरणी आणखी दोघांना केली नागपुरातून अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना सदस्य बनवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘लाइफ लाइन ओरिएन्टल ट्रेडलिंक्स प्रा. लि.' कंपनीच्या दोन सीनिअर चीफ एक्झिक्युटिव्ह मॅनेजरला सोमवारी (दि. ११) रात्री आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरातून ताब्यात घेऊन अटक केली. प्रवीण पांडुरंग देवीकर (३५ रा. कुंदनलाल गुप्तानगर, नागपूर) आणि विकास डिगांबरजी रोकडे (२८ रा. प्रेमनगर, नागपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १५ डिसेंबरला कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या दोन प्रमुख संचालकांना अटक केली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत कंपनीच्या पुणे, गोंदिया, नागपूर, नाशिक आदी ठिकाणच्या कार्यालयांची झडती घेऊन आवश्यक कागदपत्र रोख जप्त केली आहे. साखळी पद्धतीने ग्राहकांना तयार करून वस्तू विकणे हा कंपनीचा उद्योग होता. यामध्ये ८०० ग्राहक तयार करून सर्वोच्च पदावर जाणाऱ्या व्यक्तीला सीनिअर चीफ एक्झिक्युटिव्ह मॅनेजरपदावर पदोन्नती मिळायची. या दोघांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. या दोघांनीही साखळी पद्धतीने अप्रत्यक्षरीत्या प्रत्येकी ८०० ग्राहक तयार केले आहे. यांना प्रत्येक ग्राहकावर ०.४० टक्के इतकी रक्कम मिळायची. त्या दोघांना मंगळवारी न्यायालयापुढे हजार केले असता १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश अणे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पीएसआय गोकूळ ठाकूर, राजू शेंडे, मनोज उसरडे, ईश्वर चक्रे, अनिल तायवाडे, विनोद धुळे, किशोर अंबुलकर, अस्मिता खांडबाये, किशोर पंड्या, दीपक धाेटे यांनी केली आहे.
बडनेरा भागात यायचे मार्गदर्शनासाठी
प्रवीण देवीकर आणि विकास राेकडे हे मागील आठ वर्षांपासून कंपनीत काम करत असताना नवीन ग्राहकांनी कंपनीत यावे, यासाठी बडनेरा, अंजनगाव बारी परिसरातील गावांमध्ये मार्गदर्शनासाठी आले होते. आम्ही कमी शिकूनही आज या कंपनीमुळे मोठ्या पदावर पोहोचलो, तुम्हालासुद्धा ही संधी आहे, असे सांगून ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करत होते. गणेश अणे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
बातम्या आणखी आहेत...