आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - घरात एकटी असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच दोघांनी अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

डिगांबर शेषरावजी बोबडे(४२) संदीप लक्ष्मणराव भोयर (२४) या असे बलात्कार प्रकरणात अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी चार ते पाच दिवसांपूर्वी कुऱ्हा येथील एका १४ वर्षीय बालिकेच्या घरात जाऊन अत्याचार केला होता. यावेळी ही बालिका एकटीच घरात होती.पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.