आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच मागणाऱ्या आणखी दोन पोलिसांना केले गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनसामान्यांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा समाधानकारक नाही. अनेक पोलिस ठाण्यात गेलेल्या सज्जन माणसांचा पोलिसांप्रतीचा अनुभव सुखदायक आहे, असेही दिसत नाही. त्यातच एखादी तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात गेलेच तर कोण, कसा खिसा कापेल याचाही भरवसा नाही. दरम्यान, पोलिस आयुक्तालयात लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने गुन्हे शाखेचे पीआय अनिल किनगे हवालदार दीपक खानीवाले या दोघांना चार दिवसांपुर्वीच अटक केली. ही घटना ताजीच असताना सोमवारी (दि. २४) पुन्हा जिल्ह्यातील आसेगाव ठाण्यात कार्यरत हवालदार गोविंद देवमन वानखडे शिपाई राजेश देविदास वानखडे या दोन पोलिसांना लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने अटक केल्याने ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नुकत्याच घडलेल्या या दोन घटनांवरून लाचखोरीने बरबटलेल्या पोलिस दलाचे वाभाडे निघाले आहे.
सर्वसामान्य व्यक्तींना अनेकदा कायदेशीर कामासाठी काही पोलिस स्वत:कडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून लाच मागते. वास्तविकता लाच मागणे हा गुन्हा आहे. लाच घेतली तर एसीबी कारवाई करते. आपण निलंबीत होणार, ही बाब सुध्दा लाच घेणाऱ्यांना किंवा लाचेची मागणी करणाऱ्यांना चांगल्या पध्दतीने ठाऊक आहे. मात्र तरीही निर्ढावलेले हे लाचखोर बिनधास्त लाच मागतात. हेच या घटनांवरून पुढे येत आहे. सदैव सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या बहूतांश पोलिसांचे नाव अशा लाचखोरांमुळे मातीत मिसळले जाते. या दोन्ही प्रकरणात किंवा लोणी पोलिस ठाण्याचे १५ ऑक्टोंबरला पकडलेले पोलिसांचे उदाहरण पाहता लाचेसाठी यांनी कोणत्या स्तरावर उतरावे, याचा भयंकर नमुना समोर आला आहे.
आयुक्तालयाचे क्राईम पीआय किनगे खाणीवाले यांची एसीबीकडे १० ऑगस्टला तक्रार झाली, एसीबीने चार वेळा पडताळणी करून दोन वेळा ट्रॅप लावला होते. तरीही त्यांच्याकडून लाच मागण्याची प्रक्रीया सुरूच होती. लोणीचे दोन पोलिस लाच स्विकारण्यासाठी बंदोबस्त असूनही बडनेरात आले होते. यावरून लाचखोर पोलिसांची मानसिकता किती निर्ढावली असल्याचे दिसून येत आहे.

लाचखोरीत अमरावती जिल्हा आघाडीवर
लाच मागितल्यास थेट करावी तक्रार
^कोणत्याहीलोकसेवकानेलाच मागितली तर तत्काळ आमच्याकडे तक्रार करा. यासाठी थेट कार्यालयात येऊन किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावरसुध्दा तक्रार नोंदवता येईल. लाचखोरािवरुध्द पुढील काळातही अशाच कारवाई सुरू राहणार आहे. तक्रारदाराचे नाव पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल.’’ महेशचिमटे, अधीक्षक, एसीबी.

अमरावती विभागात जानेवारी २०१६ पासून लाचखोरांविरुद्ध एसीबीच्या पथकाने एकूण ९५ ट्रॅप टाकले. यामध्ये अमरावती जिल्हा आघाडीवर असून, अमरावतीत २७ ट्रॅप झाले. त्यापाठोपाठ बुलडाण्यात २२, यवतमाळ १९, अकोला १४ आणि वाशिममध्ये १३ ट्रॅप एसीबीने आतापर्यंत केले आहेत. जिल्ह्यातील २७ ट्रॅपमध्ये एकूण ३५ जणांविरुध्द कारवाई झाली. यातही यंदा विभागात ९५ पैकी १९ ट्रॅप हे लाच मागणीचे आहेत. या मागणीच्या १९ ट्रॅपमध्येसुध्दा अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. ट्रॅप हे अमरावतीतील आहेत. विशेष म्हणजे विभागात झालेल्या झालेल्या ९५ ट्रॅपपैकी सर्वाधिक २० ट्रॅप हे पोलिसांवर झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...