आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धडकेत दोन युवक ठार टिप्परची दुचाकीला धडक,१ ठार,२ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - टिप्परला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला टिप्परची धडक लागून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. ही घटना अकोला जिल्ह्यातील हैसांग समोरील रामगाव या अरुंद रस्त्यावरून शनिवारी (दि. १०) दुपारी बाराच्या सुमारास घडली. अरुण गोविंद इंगळे (४०) रा. रमाई नगर, दर्यापूर असे मृतकाचे नाव आहे. सागर देविदास वानखडे (२५) शेखर वानखडे (३८) दोघेही रा . दर्यापूर या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
अपघातातील मृतक जखमी हे मूर्तिजापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. दरम्यान रामगाव येथे टिप्परला ओव्हरटेक करत असताना दुचाकीला (एमएच १२/ ५८८७) धडक लागल्याने यात इंगळे यांचा दर्यापूर येथे उपचारासाठी आणत असताना वाटेतच मृत्यू झाला, इंगळे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,भाऊ असा आप्त परिवार आहे.
बडनेराकडू नरहाटगावकडे येणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १०) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक्स्प्रेस हायवेवरील संकेत कॉलनीजवळच्या बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ घडला.

अतुन पांडुरंग तेलंगे (३५, रा. नवजीवन कॉलनी, आशियाड कॉलनीजवळ) आणि राजेश वैद्यनाथ मिश्रा (३१, रा. रहाटगाव) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. अतुल राजेश हे दोघे मित्र शनिवारी दुपारी काही कामानिमित्त एक्स्प्रेस हायवेने गेले होते. काम आटोपून बडनेराकडून रहाटगावकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला (एम. एच. २७ झेड ७२५५) मागून नागपूरकडे जाणाऱ्या कारने (एम. एच. ३१ डिसी ६७७८) धडक दिली. या धडकेत दुचाकीवर अतुल राजेश दोघेही खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने इर्विनमध्ये दाखल केले असता तपासणीअंती डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार कैलाश पुंडकर, पीएसआय शंकर डेडवाल इतर पोलिस घटनास्थळी पोहचले होते. या प्रकरणी कारचालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...