आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माओवाद्यांचे धडे असणाऱ्या पुस्तकांची चौकशी सुरू, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर  - ‘एनसीईआरटी’च्या दहावी आणि बारावीच्या राज्यशास्त्र आणि समाज विज्ञानाच्या पुस्तकात माओवादी नेत्यांचे गोडवे गायले गेल्याचे आक्षेपार्ह प्रकरण उघडकीस आल्यावर केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली अाहे. या खात्याचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. चौकशी झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल, एवढेच सांगून त्यांनी या संदर्भात अधिक बाेलणे टाळले.  

नॅशनल काैन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) प्रकाशित केलेल्या दहावीच्या समाज विज्ञानाच्या ‘डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स-२’ या पुस्तकातील पॉलिटिकल पार्टीज या सहाव्या धड्यात माओवादी विचारसरणीवर आधारित मजकुराचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये २०११ मध्ये चकमकीत ठार झालेला माओवादी नेता मालोजुला कोटेश्वर राव ऊर्फ किशनजी याचे लोकशाहीवरील विचार या पाठात मांडण्यात आले आहेत. सुरुवातीला हे पुस्तक २००७ मध्ये प्रकाशित झाले हाेते. चूक लक्षात अाल्यानंतरही ते सातत्याने पुनर्प्रकाशित करण्यात येत आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी ते अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. सीबीएसईकडून प्रकाशित या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराची आजवर कुठल्याही शासकीय यंत्रणेकडून तपासणी अथवा दखल घेण्यात आलेली नाही.   
 
अाक्षेपार्ह माहिती
कधीकाळी माओवादी हिंसक कारवायांचा मुखिया ठरलेला किसनजीला लोकशाही विचारवंत म्हणून पुस्तकात स्थान मिळाले असून त्याच्या विचारांचे गोडवे गाण्यात आले आहेत. प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही तर एनसीआरटीईच्या बारावीच्या पुस्तकातही संपूर्ण एक पानात नक्षलवादी चळवळीचा इतिहास मांडण्यात आला असून त्यातही नक्षलवादी विचारसरणीचे गोडवे गाण्यात आले आहेत. नक्षलवादी चळवळीचा विकास कसा झाला, याबाबतही अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...