आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमिओपॅथीची विश्वसनीयता वाढवण्यावर तज्ज्ञांनी भर द्यावा- केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - होमिओपॅथीचा ऐतिहासिक वारसा जोपासत होमिओपॅथी तज्ज्ञांनी शिक्षण, संशोधन आणि उपचारासोबतच यापॅथीची विश्वासार्हता वाढवण्यावर भर द्यावा. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी नागपुरात बोलताना दिली.
नागपुरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन्सतर्फे चिटणवीस सेंटरमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेच्या उद‌्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते.
ते म्हणाले, देशात होमिओपॅथीचे उपचार घेणाऱ्यांची संख्या १० ते १२ टक्के असून गरिबांनाही परवडेल अशी ही पॅथी आहे. त्यामुळे या पॅथीच्या उपचार सेवेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडून सर्वोतपरी मदत होईल. देशात दोनशेच्या आसपास होमिओपॅथ शैक्षणिक संस्था आहेत. या पॅथीच्या प्रसारासाठी गावखेड्यात पथक तयार करण्यावर भर द्यावा. विभागीय स्तरावर एक्सॅलन्स सेंटर तयार करण्यासाठी शासनाकडून मदत केली जाईल. आयुषचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत झिरपल्यानंतर सार्वजनिक आरोग्यावरचा ताण कमी होऊ शकतो.