आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचा आज नागपुरात दौरा; रेल्वेच्या काही महत्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचे उद्या नागपुरात आगमन होणार असून रेल्वेमंत्र्यांच्या या दौऱ्यात अनेक प्रकल्पांच्या घोषणांसह रेल्वेच्या काही उपक्रमांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. अलिकडेच मध्य रेल्वेने नागपुरातून काही नव्या सुपरफास्ट गाड्या सुरु करण्याची घोषणा केली आहे. पुणे, अमृतसर, अमरावती-पुणे या विशेष गाड्यांना रेल्वेमंत्री प्रभु हिरवी झेंडी दाखविणार आहेत.
 
नागपूर रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा, अमला-परासिया रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, चंद्रपूर रेल्वे स्थानकाचे सौदर्यीकरण, नागपूर, वर्धा, बल्लारशा आणि सेवाग्राम स्थानकांवर एलईडी दिव्यांची व्यवस्था या प्रकल्पांचा शुभारंभ प्रभु यांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय नागपूर-इटारसी तिसरा रेल्वेमार्ग, वर्धा-बल्लारशा तिसरा मार्ग, नागपूर-वर्धा तिसरा आणि चवथा मार्ग, वडसा-गडचिरोली नवा रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा शुभारंभ रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
 
याशिवाय रेल्वेमंत्री प्रभु यांच्याकडून काही नव्या प्रकल्पांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. वन विभागाने गोंदिया-जबलपूर नव्या ब्रॉडगेज मार्गाला हिरवी झेंडी दाखविली आहे. हा रेल्वेमार्ग बालाघाट जिल्ह्यातील वनक्षेत्रातून जाणार असल्याने नागपूर-जबलपूर अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून हा रेल्वे मार्ग जाणार असल्याने वन विभागाकडून परवानगीसाठी अडचणी येत होत्या. या क्षेत्रातून जाताना गाड्यांच्या वेगावर मात्र मर्यादा येणार असून ताशी ४५ किलो मीटर पेक्षा अधिक वेग ठेवता येणार नसल्याचे सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...