आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठे कदापि देशद्रोही विचारांची केंद्रे ठरता कामा नये: भैय्याजी जोशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंसेवक हत्येेविरोधात काढला संवेदना मार्चमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते. - Divya Marathi
स्वयंसेवक हत्येेविरोधात काढला संवेदना मार्चमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते.
नागपूर- देशातील विद्यापीठांमध्ये आता विद्यार्थी देश तोडण्याच्या घोषणा द्यायला लागले आहे. यामागे साम्यवादी विचारसरणी असून हे षडयंत्र वेळीच ठेचायला पाहिजे. विद्यापीठे कदापि देशद्रोही विचारांचे केंद्र ठरता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
 
केरळमधील बिघडलेली कायदा सुव्यवस्था लक्ष्य करून होत असलेल्या संघ स्वयंसेवकांच्या हत्येच्या विरोधात लोकाधिकार मंचातर्फे मार्चला सायंकाळी संवेदना मार्च काढण्यात आला. संविधान चौक ते आकाशवाणी चौक असा निघालेला मार्च फिरून संविधान चौकात आल्यावर सभेत रूपांतर झाले. या सभेला संबोधित करताना भय्याजी जोशी बोलत होते. केरळचे प्रचारक व्ही. मुरलीधरन यांनीही मार्चला संबोधित केले. 
 
यावेळी बोलताना भय्याजी जोशी यांनी केरळमधील हिंसाचाराला तेथील राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. केरळमधून साम्यवादी सरकारचे पाय देशात उमटले परंतु साम्यवादी सरकारची आजची स्थिती दयनीय असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र सरकारने त्वरित कडक पावले उचलून कारवाई करण्याची गरज आहे.
 
केरळमधील हिंसाचाराला राज्य सरकारचा पाठिंबा आहे. या हिंसाचारातून सरकारचा अमानवीय चेहरा समोर आला. अशा हिंसाचारावर कारवाई व्हावी, अन्यथा सत्ता सोडावी, देशभक्त सरकार चालविण्यास समर्थ असल्याचे भय्याजींनी म्हणाले. 
 
यावेळी बोलताना व्ही. मुरलीधर राव यांनी सीपीएम हा एक आकड्यापुरता पक्ष उरला असल्याचे सांगितले. संसदेत यापक्षाचे केवळ सदस्य आहेत. केरळमध्येही असाच हिंसाचार सुरू ठेवला तर तेथूनही हा पक्ष संपुष्टात येईल.
 
सीपीएमने ११०० दलितांवर अत्याचार केला आहे तर लाखांवर गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. केरळमधील माकप कार्यकर्ते राज्य सरकारच्या संरक्षणात हिंदु संघटना तसेच स्वयंसेवकांच्या हत्या करीत असल्याचे व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले. या सभेला श्रीमंत मुधोजी राजे भोसले, महापौर प्रवीण दटके, बी. सी. भरतीया, उदयभास्कर नायर, संयोजक सुभाष कोटेचा हजर होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...