आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या उषाताई चाटी यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांचे गुरुवारी दुपारी ४.१५ वाजता नागपुरात निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. १५ दिवसांपासून त्या आजारी होत्या. गुरुवारी दुपारी अहल्या मंदिर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे समितीने कळवले आहे. राष्ट्र सेविका समितीच्या त्या माजी अखिल भारतीय प्रमुख संचालिका होत्या. १९९४ ते २००६ या काळात प्रमुख संचालिका म्हणून नेतृत्व केले. त्यांच्याच कार्यकाळात २००५ मध्ये नागपुरात १० हजार सेविकांचे अखिल भारतीय शिबीर पार पडले होते. उषाताईंची बरीचशी कारकीर्द उत्तर प्रदेशात राहिली. तेथे समितीचे काम वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांचे वास्तव्य अहल्या मंदिरात होते. 
बातम्या आणखी आहेत...