आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Medical Services Charges Go Up In Government Hospital

वाढीव शुल्कामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये ‘वादावादी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच बेजार झाली असतानाच राज्य शासनाने सर्वच शासकीय रुग्णालयांतील विविध सेवा शुल्कांमध्ये भरमसाट वाढ केल्याने आर्थिक दुर्बल घटकांची मोठी पंचाईत होत आहे. दरम्यान, या वाढीव शुल्काबाबत रुग्णालयात कुठेही उल्लेख नसल्याने नागरिक अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासन मात्र वाढीव शुल्क आकारत असल्याने रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रमाण वाढले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या तपासणी सेवा त्याबाबतचे रुग्ण शुल्क शासन निर्णयानुसार आकारण्यात येत आहेत. सदर रुग्ण शुल्क मागील १० वर्षांहून अधिक कालवधीपासून आकारण्यात येत असून, यामध्ये सध्या अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर रेडिआेलॉजी सुविधा यांसारख्या योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. यासोबतच शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील आैषधोपचारासाठी तसेच निरनिराळ्या वैद्यकीय सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण आैषधी द्रव्य विभागाने घेतलेला आहे. याच धर्तीवर शासनाच्या दोन रुग्णालयांमधील रुग्ण शुल्कामध्ये भिन्नता असू नये आणि नवीन योजनांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत शासकीय रुग्णालयात आकारण्यात येणाऱ्या रुग्ण शुल्क दरात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

रुग्णआहेत अनभिज्ञ : शुल्कातवाढ करण्यात आली, याबद्दल बहुतांश रुग्ण अनभिज्ञ आहेत. सुधारित दर वाढले आहेत, याबद्दल सीएसने नोटीस बोर्डवर सूचित करणे गरजेचे होते. परंतु, रुग्णालयाकडून असे काहीच करण्यात आलेले नाही. यामुळे रुग्णालय प्रशासन रुग्णांमध्ये बाचाबाचीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येकच रुग्णाला शुल्क वाढले अाहे, असे सांगितले जात आहे. वाढीव शुल्काबाबत जर रुग्णालयाने नोटीस बोर्डवर यादी ठेवली तर ही समस्या येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

आदेशाची अंमलबजावणी सुरू
शासन निर्णयानुसार हे दर वाढवण्यात आले आहे. जानेवारीपासून सुधारित दराप्रमाणे रुग्णांकडून शुल्क आकारावे, असे शासनाकडून सांगण्यात आले. सुधारित दरात जवळपास सर्वच आजारांच्या विविध प्रकारांत वाढ करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात सुधारित दराप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे. डॉ. अरुण राऊत, सीएस,जिल्हासामान्य रुग्णालय,अम.

१८ संवर्गांची मोफत सुविधा कायम
शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार ज्या संवर्गांना विनाशुल्क वैद्यकीय उपचाराची सवलत देण्यात आली आहे ती यापुढेही चालू राहणार आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय आणि इतर १८ संवर्गातील नागरिकांना मोफत सुविधा कायम राहणार आहे.