आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशीम रस्त्यावर टेम्पो आणि कारचा अपघात, दोन जण ठार, एक गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- शनिवारी झालेल्या मित्राचे लग्न आटोपून रविवारी अकोल्याला कामानिमित्त जाणाऱ्या तिघा मित्रांची कार पीकअप टेम्पो आणि ट्रेलरमध्ये दाबली जाऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. मृत नांदेड व लातूर येथील रहिवासी आहेत.

लातूर येथील अलोक अशोक अवस्थी (३६) व योगेश विजय भातलवंडे (३५) हे हिंगोली येथे एका लग्नासाठी कारने (एमएच २४- एफ- २६२) निघाले. येताना नांदेड येथून त्यांनी मित्र धनंजय घनश्याम शुक्ला (४१) यांनाही सोबत घेतले. शनिवारी लग्नाचा कार्यक्रम झाल्यावर रविवारी सकाळी ४ वाजता हे तिघेही कामानिमित्त अकोल्याला निघाले. येथून सुमारे २० किमी अंतरावरील फाळेगाव पाटीजवळ त्यांच्या कारला मागून भरधाव येणाऱ्या पीकअप टेम्पोने (एमएच- २९- एटी- ३२७) जोरदार धडक देऊन पुढे ढकलत नेले. पुढे मंद गतीने जाणाऱ्या ट्रेलरला हे दोन्ही धडकले.
मोठा आवाज आल्याने ट्रेलर थांबले आणि पीकअपच्या धडकेने कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. त्यात धनंजय आणि अलोक (कार मालक व चालक) हे दोघेही जागीच ठार झाले. तर योगेश गंभीर जखमी झाला. हिंगोली ग्रामीण व कनेरगाव नाका पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी फाळेगाव, आंबाळा येथील ग्रामस्थांच्या मदतीने मृत व जखमींना कारमधून बाहेर काढले.
बातम्या आणखी आहेत...