आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीपाल्याचे पॅकिंग करताना ‘भाजी बाजार’मधील महिला कर्मचारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - किरकोळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय हा तसा सामाजिक दृष्ट्या प्रस्थापितांकडून नाक मुरडणाराच व्यवसाय. त्यामुळे सुशिक्षित हाती तराजू घेवून भाजी विक्रीसाठी बसले, असे दिसत नाही. परंतु महेंद्र टेकाडे या पदविकाधारक अभियंत्याने व्यावसायिकता बदलत्या काळाची पावलं ओळखली. हातगाडी किंवा बाजारात जाण्यासाठी वेळ मिळत नसल्याची समस्या महेंद्रसाठी व्यवसायाची संधी ठरली. घरपोच भाजीपाला पोहोचवून महेंद्रने या व्यवसायात जम बसवून सुशिक्षित बेरोजगारांपुढे आदर्श उभा केला आहे.

दर्यापूरच्या महेंद्र प्रल्हादराव टेकाडे यांनी १८ वर्षांपूर्वी मॅकेनिकल पदविका घेतली. त्यानंतर खासगी नोकरी केली. कुठे तरी स्थिर व्हाव, स्वत:चा व्यवसाय करावा म्हणून त्यांनी व्यवसायाचा शोध सुरू केला. व्यवसाय निवडायचा तर कोणता? हा प्रश्न होता. त्यावेळी स्वच्छ भाजीपाला प्रत्येकाला पाहीजे, दिवसेंदिवस वाढणारी नागरिकांची व्यस्तता, अशावेळी भाजीपाला प्रत्येकाला घरी पोहोचवून देण्याची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. डिसेंबर २०१५ ला महेंद्र यांनी प्रत्यक्षात या व्यवसायाला सुरूवात केली. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी कृषीचे ज्ञान असलेल्या मुलांकडून ८०० नागरिकांचा सर्वे केला होता. त्या सर्वे दरम्यान त्यांना किमान ५०० जणांनी भाजीपाल्याची मागणी केली होती. त्याचवेळी त्यांनी भाजीपाला घरपोच पोहोचवण्याची सोय केली. नऊ महिन्यांपूर्वी ५०० असलेले ग्राहक आता हजार ५०० झालेले अाहे. ‘भाजी बाजार’ नावाने सुरू केलेल्या या प्रकल्पाला गृहिणींनी प्रतिसाद दिला. मोबाईल कॉलवर मागणी करणाऱ्यांना भाजीपाला घरपोच मिळतो. महेंद्र यांच्याकडे या कामासाठी १३ युवक, युवती कार्यरत आहेत. भाजीपाला पोहोचवण्यासाठी वातानुकुलित व्हॅन दुचाकी आहेत.

४१ प्रकारच्या भाज्या पोहोचवतात घरोघरी
महेंद्रटेकाडे भाजी बाजार मार्फत ४१ प्रकारच्या भाज्या गृहिणींना रोज पोहोचवून देतात. दरदिवशी ते क्विंटल भाजीपाल्याची मागणी आहे. भाजी पाल्याला स्वच्छ पाण्याने धुतल्या नंतर हा भाजीपाला ग्राहकांच्या घरी पोहोचवण्यात येतो. सद्य:स्थितीत ३५ ते ४० शेतकरी आमच्यासोबत जुळले असून, त्यांच्याकडील भाजीपाला आम्ही खरेदी करतो.
बातम्या आणखी आहेत...