आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ आरोपीस ७ वर्षांची केली शिक्षा, बालिकेवरील अत्याचार प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- बालिकेवरील अत्याचार प्रकरणी कल्पेश बासू बारवे (३०) रा. वडगाव याला अचलपूर न्यायालयाने बुधवारी ऑगस्टला सात वर्षे सक्त मजुरी हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्राप्त माहितीनुसार, उपरोक्त आरोपीने दोन वर्षापूर्वी परिसरातील एका बालिकेवर अत्याचार केला होता.

या प्रकरणी कल्पेशवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अचलपूर न्यायालयात खटला सुरू होता बुधवारी जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी चार साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला सात वर्षे सक्त मजुरी हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली असून, मध्यवर्ती कारागृहात आरोपीची रवानगी करण्यात आली आहे. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. ए. नवले यांनी कामकाज पाहिले.
बातम्या आणखी आहेत...