आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील नाराजीचा मुख्यमंत्र्यांंना फटका, नागपूरच्या सभेला अत्यल्प गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा फटका गुरुवारी दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील प्रचार सभेला बसला. तिकीट कापलेल्या उमेदवाराचे समर्थक व नाराज कार्यकर्ते सभेकडे न फिरकल्याने सुभाषनगरातील त्यांच्या सभेला लाेकांची अत्यल्प उपस्थिती हाेती.

नागपूरच्या प्रभाग ३७ मधील भाजपचे उमेदवार प्रमोद तभाने, नंदा जिचकार, सोनाली कडू, दिलीप दिवे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रभागात सोनाली कडू व नंदा जिचकार यांना तिकीट देण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता. तर शिक्षण सभापती गोपाल बेहरे यांचे तिकीट कापून नितीन गडकरी यांच्या ‘पूर्ती’ उद्याेग समूहाचे सीईओ सुधीर दिवे यांचे बंधू दिलीप दिवे यांना तिकीट देण्यात आले.
 
त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते खूप नाराज आहे. त्यांच्यातील खदखद गुरुवारी मुख्यमंत्र्यांना अनुभवास अाली. गोल्ड स्टार ग्राउंड, सुभाषनगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा विकासाचा अजेंडा जनतेपुढे मांडत काँग्रेसमधील भांडणांवर टीकास्त्र सोडले. मात्र हे एेकण्यास खुर्च्यांवर माेजकेच लाेक उपस्थित हाेते.  

काँग्रेस ही दिवाळखोरीत निघालेली ‘बँक’  
‘काँग्रसमध्ये दोन गटांच्या भांडणात नागपूरचा सत्यानाश झाला. काँग्रेस ही दिवाळखोरीत निघालेली बँक असून राहुल गांधी यांच्या या बँकेत मतांचे डिपॉझिट ठेवल्यास व्याज तर सोडा डिपॉझिटही मिळणार नाही. उलट आमची बँक ही मोदींची बँक आहे. गडकरी आणि मी स्वत: या बँकेत आहे. येथे मतरूपी डिपॉझिट जमा केल्यास विकासरूपी व्याज मिळेल’, असे फडणवीस सभेत म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...