आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम बाप पोटच्या मुलीला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरात घडली आहे. नराधम बाप पोटच्या मुलीला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लज्जास्पद कामात पीडितेची सावत्र आई नराधमाला साथ देत होती.

नराधम बापाच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने घरातून पळ काढून मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर तिने आपली व्यथा रेल्वे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ‍तिची रवानगरी बालसुधारगृहात केली. तब्बल पाच महिन्यांनी दाखल झालेल्या तक्रारी नंतर नागपूर पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेची आपबिती ऐकून पोलिसही झाले सुन्न...
- नागपूरमधील इतवारी भागात राहाणारी पीडिता 13 वर्षाची आहे.
- ती वडील, सावत्र आई आणि भाऊ-बहिणींसोबत राहात होती.
- पोलिसांना पीडितेने सांगितलेली आपबिती सुन्न करणारी आहे. पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पीडितेला मुंबईतील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. मागील पाच महिन्यांपासून ती मुंबईत आहे.

पुढील स्लाइड्सवरील इंफोग्राफिक्समध्ये वाचा, पीडित मुलीची आपबीती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...