आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको विदर्भ राज्य समितीचे बडनेरामध्ये आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन बडनेरा शहरात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलनात नागरिक बुधवारी (दि.११) सहभागी झाले. 
 
महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यापासून विदर्भाचा विकास झाला नाही. विकास तर सोडाच विदर्भाचे प्रश्न मार्गी लागू शकत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे समितीचे म्हणणे आहे. विविध आंदोलन करण्यात आल्यानंतर वेगळ्या विदर्भाचा निर्णय होत नसल्याने बडनेरा जुनीवस्ती भागात समितीच्या वतीने रास्ता रोको अांदोलन करण्यात आले. सावता चौक स्थानकापासून काही अंतरावर समितीचे कार्यकर्ते एकत्र झाले.
 
घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून धरला. दहा ते पंधरा मिनीट रस्ता अडविल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विदर्भातील शेतकरी कर्जमुक्त करा. वीजेचे दर निम्मावर आणणे पूर्णवेळ पूर्ण दाबाची वीज मिळावी. बेराजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणे. एमपीएससी ऐवजी व्हीपीएससीच्या माध्यमातून विदर्भातील युवकांना नोकरी देणे. उच्च तंत्रज्ञान व्यवस्थापनातील हुशार विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे.
 
वने लोह खनिजाचे प्रमाण जास्त असल्याने त्यावर आधारित उद्योग निर्माण करा. कापूस तूर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा आदी विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, जिल्हाध्यक्ष नंदू खेरडे, जगदीश नाना बोंडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख तारा बारस्कर, शहर अध्यक्ष रंजना मामर्डे, शहर प्रमुख रियाज खान, जिल्हा प्रमुख कृष्णराव पाटील, सुनील शेरेवार, प्रकाश शिरभाते, राजा तायवाडे, बाळा भेटाळू, धनराज गोटे, सतिश प्रेमलवार, जुगल ओझा, गजानन भगत, शेख मंसूर, उमा घासले, ममता नेताम, अरुण साकुरे, सुषमा मुळे, विनायक इंगोले, मंजुळा कुंभलकर, विनायक इंगोले, ज्ञानेश्वर गादे, अमोल भिसेकर, पद्माकर धस्कट, रुपराव भेंडे, डॉ. रामदास भेंडे, सुशीलचंद्र पाटील, गुलाब कोल्हे, साहेबराव इंगळे, राजू तायवाडे, शरद नांदूरकर, बंडू नांदूरकर, कमल कांबळे, विवेक टिकमवार, विक्रांत पांडव, नरेश धवस, रमेश टापरे, धनराज खंडारे, कुलदीप वानखडे, दिलीप धवस, अभिजीत धवस यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.