आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भासाठी उग्र आंदोलन, कुठे फोडल्‍या बस, कुठे दाखवले काळे झेंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्र दिनी रविवारी विदर्भ राज्याच्‍या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व विविध जिल्‍ह्यांमध्‍ये विदर्भाचा झेंडा फडकावला. काही ठिकाणी विदर्भवाद्याचे उग्र आंदोलन पाहायला मिळाले. नागपूर व यवतमाळ भागात बसच्‍या काचा फोडल्‍या....
- राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी बजाजनगरात विदर्भ राज्याचा झेंडा फडकावला.
- यावेळी अणे म्‍हणाले, मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विदर्भवादी असूनही विदर्भाच्‍या मुद्द्यावर शांत आहेत.
- अणे म्‍हणाले- भाजप आपल्‍या आश्‍वासनांना भुलली आहे. भाजप कॉंग्रेसच्‍या पायावर पाय ठेऊन चालत आहे.
- येणा-या निवडणूकांमध्‍ये भाजपाला चांगला धडा शिकवला जाईल.
- रविवारी नागपूरसह इतर 22 शहरांमध्‍ये वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावण्‍यात आला.
- दरम्‍यान काही जिल्‍ह्यात आंदोलकांना पोलिसांनी ताब्‍यातही घेतले.
पालकमंत्र्यांसमोर निदर्शने....
- महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्याच्‍या मागणीसाठी आंदोलकांनी निदर्शने केली.
- कस्तूरचंद पार्कमध्‍ये शासकीय कार्यक्रमादरम्‍यान काहींनी आंदोलनाची भूमिका घेतली.
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्‍या उपस्‍थितीत काहींनी ब्लॅक बलून हवेत सोडून निषेध नोंदवला.

यवतमाळमध्‍ये बसवर दगडफेक....
यवतमाळ जिल्‍ह्यात आंदोलनाने उग्र रूप धारण केले. काही युवकांनी यवतमाळ बस स्‍थानकावर उभ्या असलेल्‍या बसवर दगडफेक करून काचा फोडल्‍या. त्‍यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. त्‍याआधी जिल्‍ह्यात काही ठिकाणी विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावला. जांबुवंतराव धोटे, माजी आमदार विजयाताई धोटे यांच्‍या नेतृत्‍वात नेताजी चौकात काळे झेंडे आणि काळे स्टीकर लाऊन दिवसभर आंदोलन करण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वेगळ्या विदर्भासाठी असे झाले उग्र आंदोलन....
बातम्या आणखी आहेत...