आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VIJAY CHAUDHARI DEFEAT VIKRANT JADHAV IN MAHARASHTRA KESARI

विजय चौधरी सलग दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ मुंबईच्या विक्रांतला धोबीपछाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयने विक्रांतला चीत केले तो क्षण. या डावानंतर विज सलग दुसऱ्यांदा ठरला \'महाराष्ट्र केसरी\'. - Divya Marathi
विजयने विक्रांतला चीत केले तो क्षण. या डावानंतर विज सलग दुसऱ्यांदा ठरला \'महाराष्ट्र केसरी\'.
नागपूर : सबंद महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम आणि चित्त थरार लढतीत. जळगावच्या विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला धोबीपछाड देत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही लढत पाहण्यासाठी उपस्थित होते.
तत्पूर्वी, मुंबईचा मल्ल विक्रांत जाधव गदा उचलणार की, जळगावचा विजय चौधरी याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या चुरशीच्या लढतीत जळगावच्या वि़जय चौधरीने चपळाईचे प्रदर्शन करत मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3 अशा फरकाने चीत केले आणि सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलली. सलग दोन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’होणारा तो सहावा पैलवान ठराला आहे.
या आधी झालेल्या मॅट गटात मुंबईच्या विक्रांत जाधवने तर माती गटात जळगावच्या विजय चौधरीने विजय मिळवला होता.
आता थेट पोलिस दलात दिसणार महाराष्ट्र केसरी
आता महाराष्ट्र केसरी थेट पोलीस दलात आणि ते ही चांगल्या पदावर दिसतील. हो, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरीला थेट पोलिस दलात चांगल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या विभागात कुणी जिंकले कोणते पदक...