आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडगावातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह बहिरमबुवा टेकडी परिसरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. निखिल प्रकाश गाडे वय २८ रा. धनलक्ष्मी नगर, वडगाव असे मृतकाचे नाव आहे. 
 
धनलक्ष्मी नगरातील निखिल गाडे हा तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. निखिल मुक्त विद्यापीठातून एम. ए.चे शिक्षण घेत होता. १० मार्च रोजी तो अचानक कुणालही सांगता घरातून निघून गेला. कुटुंबीयांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आल्याने वडील प्रकाश गाडे यांनी वडगाव रोड पोलिसांत तक्रार दिली. 
 
दरम्यान, रविवारी वडगाव रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बहिरमबुवा टेकडी परिसरात एका पळसाच्या झाडाला निखिलचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी वडगाव रोड पोलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नोंद केली.
 
 पुढील तपास सपोनि. सारंग मिराशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका कॉमेंटमुळे वाद निर्माण झाला होता. त्यातूनच निखिलने आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...