आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका सातपुते बनली वर्धेतील पहिली हवाई सुंदरी, पाहा तिचे खास Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा- वर्धा येथील प्रियंका वि. सातपुते या 23 वर्षीय युवतीची इंडिगो एअर लाइन्‍समध्‍ये हवाई सुंदरी म्‍हणून निवड झाली आहे. काही दिवसात ती रूजू होणार आहे. या स्वप्‍नापर्यंत पोहचण्‍यासाठी प्रियंकाला अत्‍यंत खडतर प्रवास करावा लागला. प्रशिक्षण, मुलाखत, गटचर्चा, ऍप्टिट्यूड एक्‍झाम, वैद्यकीय चाचणी अशा विविध फेऱ्या पार करत प्रियंका या यशापर्यंत पोहोचली आहे. या संग्रहातून जाणून घेऊया प्रियंकाचा तिच्‍या स्‍वप्‍नापर्यंतचा थोडक्‍यात प्रवास..
स्‍वप्‍नाच्‍या मागे धावत राहिली प्रियंका....
- प्रियंका विजयराव सातपुते ही तरूणी बोरगाव (मेघे) येथील राहणारी आहे.
- प्रियंकाने यशवंत महाविद्यालयातून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
- हवाई सुंदरीचे स्‍वप्‍न बाळगून तिने नागपूरात 18 महिन्‍याचे प्रशिक्षण पूर्ण केले.
- पुढे पुणे येथे एअरपोर्टवर एक वर्ष नोकरी केली.
- न थांबता ती स्वप्‍नामागे धावत राहिली. हवाई सुंदरीसाठी तिने ऑनलाइन फॉर्म भरला.
- पुढे प्रशिक्षण, मुलाखत, गटचर्चा, ऍप्टिट्यूड एक्‍झाम, वैद्यकीय चाचणी या अशा पाय-या चढत तिने स्‍वप्‍न पूर्ण केले.
प्रियंकाचे वडील....
- प्रियंकाचे वडील विजयराव रामाजी सातपुते हे आयटीआयमध्ये शिक्षक होते.
- 2009 मध्ये वडिलांचे निधन झाले. आई प्रियंकाच्‍या पाठीशी उभी राहिली.
- वडिलांच्‍या निधनानंतर प्रियंकाची आई खंबीरपणे तिच्‍या पाठीशी उभी राहिली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, वर्धेतील पहिल्‍या हवाई सुंदरीचे फोटो...