आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी असलेल्या वर्धेत तळीराम तहसीलदाराचा जिल्हाधिकारी कार्यालयातच राडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा – जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासन विभागाचे तहसीलदार निनाद दैठणकर यांनी दारूच्या नशेत कार्यालयात येऊन राडा घातला. दरम्यान, खुद्द जिल्‍हाधिका-यांनी पोलिस अधीक्षक यांना फोन करून या बाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्‍थळी येत दैणणकर यांना ताब्‍यात घेतले. न्‍यायालयाने जामीनवर त्‍यांची सुटका केली.
जिल्‍ह्यात दारूबंदी आहे. असे असताना अधिकारीच तर्र होऊन शासकीय कार्यालयात येत आहेत. परिणामी, दारूबंदी आणि दारूमुक्‍तीच्‍या घोषणा केवळ कागदावरच असल्‍याचे दिसून येते.
दैठणकर यांना निलंबनाची करा
दैठणकर हे ने‍हमीच कार्यालयामध्‍ये नशेत येतात. झिंगलेल्‍या अवस्‍थेत ते काम करत असतात. त्‍यामुळे त्‍यांना जिल्‍हा प्रशासनाने निलंबित करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने जिल्‍हाधिकारी यांना दिलेल्‍या निवेदनात केली आहे.