आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मानी संकट : पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे सावट, नागपूरात अवघा 10 टक्के पाणीसाठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील धरणांमध्ये अवघा 24 टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात तर अवघा 10 टक्के पाणीसाठा आहे. - Divya Marathi
राज्यातील धरणांमध्ये अवघा 24 टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात तर अवघा 10 टक्के पाणीसाठा आहे.
नागपूर- मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने राज्यात अनेक ठिकाणी दूबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या संकटामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या 24.38 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच वेळेस अवघा 13.68 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागात सगळ्यात कमी म्हणजे 10.40 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याठिकाणी याचवेळी 11.73 टक्के पाणीसाठा होता. 
 
अमरावती विभागात गतवर्षी 12.68 टक्के साठा होता. यंदा आतापर्यंत 19.71 टक्के साठा झाला आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मोठे, मध्यम आणि लघु असे 3,249 प्रकल्प राज्यात आहेत. सध्या धरणांमध्ये 9,898 टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सर्वात जास्त पाणी हे कोकण विभागात उपलब्ध आहे. तेथे 61.97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
 
मराठवाड्यातील स्थिती सुधारली
मराठवाड्यातील जलाशयांमध्ये सध्या 17.65 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी मराठवाड्यातील जलाशयांमध्ये अवघा 1.19 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. जायकवाडी धरणात 17.79 टक्के, येलदरीत 3.05 टक्के तर मांजरा धरणात 24.60 टक्के पाणीसाठा आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे संकट मात्र उभे ठाकले आहे. 
 
नागपूरमधील प्रमुख जलाशयांची स्थिती
पेंच तोतलडोहात 5.47 टक्के पाणी उपलब्ध आहे. भंडाऱ्यातील इटियाडोहात 14.62 टक्के पाणीसाठा आहे. बाघ-शिरपूर येथे केवळ 0.075 टक्के पाणीसाठा आहे. 
 
 
नाशिक विभागात 12.61 टक्के जास्त पाणी
नाशिक विभागात गतवर्षी यावेळेस केवळ 9.58 टक्के पाणीसाठा होता. यंदा तो 22.13 टक्के आहे. जळगाव येथील ऊर्ध्व तापी हतनूर प्रकल्पाता 6 टक्के पाणीसाठा आहे. वाघूर येथे 63.33 टक्के, अहमदनगर येथील मुळा प्रकल्पात 12.12 टक्के, नाशिकच्या दारणा प्रकल्पात 58.28 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 
 
विभागवार पाण्याची उपलब्धता
अमरावती 452 826 टीएमसी 19.71 टक्के.
नागपूर 384 479 टीएमसी 10.40 टक्के.
नाशिक 556 1,289 टीएमसी 22.13 टक्के.
मराठवाडा 957 1,284 टीएमसी 17.65 टक्के.
 
बातम्या आणखी आहेत...