आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियोजन, समन्वय नसल्यामुळे स्मार्ट सिटीत कृत्रिम पाणीटंचाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पाणीहे जीवन असताना गेल्या आॅगस्टपासून ते सप्टेंबरपर्यंत असे एक महिन्यात सात दिवस कधी एमएसईबी, तर कधी मजीप्राने दुरुस्तीचे काम काढल्यामुळे अमरावती शहरातील नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. बरे मध्यंतरी दोन दिवसांचे सांगून चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना पाण्याअभावी हाल सहन करावे लागले. कोणी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले, तर कोणी ट्युब वेलवरून पाणी भरून आणले. एवढेच नव्हे, तर काहींनी पिण्यासाठी विकतही घेतले. बऱ्याच लोकांनी घरातील अगदी लहान-सहान भांडीही भरून ठेवली. पण, पाणी पुरणार किती. असे सतत सुरू असल्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला असून, त्यांनी सतत मजीप्राकडे तक्रारी निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील नळाला पाणी नसण्यासाठी मजीप्राच नाही, तर एमएसईबीही जबाबदार आहे. एमएसईबीने १३२ केव्ही (किलोवॉट) लाइनवर सबस्टेशन जोडायचे असल्यामुळे सतत तीन आठवडे बंद घेतला. सोबतच एमएसईबीचे ट्रिपिंगही वाढले आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग चार दिवस शहर पाण्यावाचून तडफडत राहिले. २५ २६ ऑगस्टला एमएसईबीने काम काढल्यामुळे मग मजीप्रानेही सिंभोरा येथून अमरावतीकडे येणारी १५ मिमी व्यासाची पाइपलाइन करजगावजवळ फुटल्यामुळे ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. आमचे काम पूर्ण झाले नाही, म्हणून २७ २८ ऑगस्टला बंद घेण्यात आला, अशी माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिली. सिंभोरा येथे ७५० अश्वशक्तीच्या चार मोठ्या मोटार बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे अमरावती शहराला पाणीपुरवठा होतो. यासाठी टाकण्यात आलेली विजेची लाइन १३२ केव्हीला जोडलेली आहे. त्यामुळे मोर्शी सबस्टेशनला काही काम असले की, वीजपुरवठा खंडित करावा लागतो. कधी तर तो आपोआपच बंद पडतो, अशात बरेच पाणी वाया जाते. कारण एकाच वेळी चारही मोटार सुरू करता येत नाहीत. १५ मिनिटांच्या अंतराने एका तासात चारही मोटार सुरू कराव्या लागतात. त्यामुळे एका तासात १५ लाख लीटर पाणी वाया जाते. जर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला, तर ४५ लाख लीटर पाणी वाया जाते. अशात शहरात उंचावर असलेल्या तपोवन, भीमटेकडी, मायानगर भागातील नागरिकांना पाणीच मिळत नाही, अशी माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिली.

अप्परवर्धा धरणात ९८.०४ टक्के जलसाठा : सध्याअमरावती शहराला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ३४२.३८ मीटर अर्थात ९८.०४ टक्के जलसाठा आहे. एक महिना आधी ३४१.४८ मीटर अर्थात ८९.२९ टक्के जलसाठा होता. ४३०२ चौ.किमी जलग्रहण क्षेत्र असलेल्या या धरणात वरुड, काटोल, नरखेड, जलालखेडा, इटावा या बाजूला असलेल्या जलस्रोतांद्वारे पाणी मिळत असते. त्यामुळे दोन वर्षे शहराला अखंडितपणे पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गजानन साने यांनी दिली.
जुनेस्रोत सध्या कामाचे नाहीत : अप्परवर्धासारखे भक्कम खात्रिलायक जलस्रोत असताना छत्री तलाव, पेढी नदी आणि वलगाव यांसारख्या फारच कमी पाणी खात्रीचे नसलेल्या जलस्रोतांवर अवलंबून राहणे शक्य नाही. येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात अंडरग्राउंड मशिनरी कालबाह्य झाली आहे.

पाणीपुरवठा नियमित हवा
गेलेकाही आठवडे सतत नळाला पाणी नसते. दोन दिवस नळ येणार नाही, असे कळले. मात्र, चार दिवस आला नाही. आम्हालाच काय पण, सर्वांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागले. कोणी तर पाणी खरेदी केले.'' लीनाकांडलकर, गृहिणी.

एक महिन्यात त्रस्त झालो
गेल्याएका महिन्यात सतत पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. पाण्याचा किती साठा करून ठेवावा यालाही मर्यादा आहेत. अगदी घरातील लहान-सहान भांडीही भरून ठेवावी लागतात.'' शुभांगीपानबुडे, गृहिणी.

अमरावतीकडेयेणारी १५ मिमी व्यासाची पाइपलाइन करजगावजवळ फुटल्यामुळे ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. आमचे काम पूर्ण झाले नाही, म्हणून २७ २८ ऑगस्टला बंद घेण्यात आला, अशी माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिली.

सिंभोरा येथे ७५० अश्वशक्तीच्या चार मोठ्या मोटार बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे अमरावती शहराला पाणीपुरवठा होतो. यासाठी टाकण्यात आलेली विजेची लाइन १३२ केव्हीला जोडलेली आहे. त्यामुळे मोर्शी सबस्टेशनला काही काम असले की, वीजपुरवठा खंडित करावा लागतो. कधी तर तो आपोआपच बंद पडतो, अशात बरेच पाणी वाया जाते. कारण एकाच वेळी चारही मोटार सुरू करता येत नाहीत. १५ मिनिटांच्या अंतराने एका तासात चारही मोटार सुरू कराव्या लागतात. त्यामुळे एका तासात १५ लाख लीटर पाणी वाया जाते. जर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाला, तर ४५ लाख लीटर पाणी वाया जाते. अशात शहरात उंचावर असलेल्या तपोवन, भीमटेकडी, मायानगर भागातील नागरिकांना पाणीच मिळत नाही, अशी माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिली.

अप्पर वर्धा धरणात ९८.०४ टक्के जलसाठा
सध्या अमरावती शहराला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वर्धा धरणात ३४२.३८ मीटर अर्थात ९८.०४ टक्के जलसाठा आहे. एक महिना आधी ३४१.४८ मीटर अर्थात ८९.२९ टक्के जलसाठा होता. ४३०२ चौ.किमी जलग्रहण क्षेत्र असलेल्या या धरणात वरुड, काटोल, नरखेड, जलालखेडा, इटावा या बाजूला असलेल्या जलस्रोतांद्वारे पाणी मिळत असते. त्यामुळे दोन वर्षे शहराला अखंडितपणे पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गजानन साने यांनी दिली.

जुने स्रोत सध्या कामाचे नाहीत
अप्पर वर्धासारखे भक्कम खात्रिलायक जलस्रोत असताना छत्री तलाव, पेढी नदी आणि वलगाव यांसारख्या फारच कमी पाणी खात्रीचे नसलेल्या जलस्रोतांवर अवलंबून राहणे शक्य नाही. येथे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात अंडरग्राउंड मशिनरी कालबाह्य झाली आहे. त्यांचा विचार केलेलाच बरा, अशी माहिती मजीप्राच्या अभियंत्यांनी दिली.
विद्युत ट्रान्सफार्मर जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

८० लाखांचे वीज बिल
मजीप्रादरमहा एमएसईबीकडे पाणीपुरवठा योजनेसाठी सरासरी ८० लाख वीज बिल भरत असते. यात मालटेकडीचे ३.२५ लाख, तपोवानचे ३.२५ लाख आणि सिंभोरा पाणीपुरवठा योजनेचे सरासरी ७० लाख बिल भरले जाते. तरीही वीजपुरवठा वारंवार ट्रिप होतो, असे मत मजीप्राचे उपअभियंता दीपक आमले यांनी व्यक्त केले.

पोलिस आयुक्तांचेही पत्र
शहरातपाणीपुरवठा बंद राहत असल्याने खुद्द पोलिस आयुक्तांनी मजीप्राला पत्र पाठवले. गणेशोत्सव असल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत. याची दखल घेत मजीप्राने एमएसईबीला पत्र पाठवले १३२ केव्ही लाइन टाकण्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे कळवले आहे.

हा नियोजनाचा अभाव
यंत्रणेनेकामे नियोजित वेळेत पूर्ण केली तर नागरिकांना त्रास होणार नाही. चार दिवस पाणीपुरवठा बंद राहतो, म्हणजे नियोजन नाही तसेच अधिकाऱ्यांचा आपसात ताळमेळ नाही. मग स्मार्ट सिटीत २४ तास पाणी कसे पुरवणार?'' सोमेश्वरपुसतकर.

कामामुळे होतेय वीज बंद
सबस्टेशनसाठी१३२ केव्हीची लाइन टाकायची असल्यामुळे नाइलाजास्तव काही दिवसांत मोर्शी, सिंभोरा परिसरातील वीज बंद ठेवावी लागला. अन्यथा कामच करता आले नसते. मजीप्राला याची कल्पना दिली होती.'' एन.टी. चौधरी, कार्यकारी अभियंता, महावितरण.

लाइट ट्रिप होत असल्याने खंडित
सततकोणत्या ना कोणत्या कारणामुळे मोर्शी ते सिंभोरा ही एमएसईबीची ३३ किलोवॉट लाइन दिवसभरातून तीन ते चार वेळा ट्रिप होते. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे.'' संजयसाबापुरे, शाखा अभियंता, यांत्रिकी, मजीप्रा.

या कारणांमुळे पाणीपुरवठा बंद
ऑगस्ट एमएसईबीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद राहिल्याने शहरात पाणी पुरवणारे चारही पंप बंद होते.
२४ ऑगस्ट एमएसईबी१३२ केव्हीची (मोर्शी सबस्टेशन) लाइन टाकण्याचे काम करीत असल्याने पुन्हा पाणीपुरवठा खंडित.
२५ ऑगस्ट अनायसेएमएसईबीचे काम सुरू असल्याने अन् सिंभोरा येथून शहराकडे येणारी १५ मिमी व्यासाची पाइपलाइन करजगावाजवळ फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद.
२५ ऑगस्ट पाइपलाइनदुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पाणीपुरवठा करण्यात बंद.
२६ ऑगस्ट एमएसईबीचेकाम पूर्ण, पण मजीप्राची अपूर्ण राहिल्याने पाणीपुरवठा बंद.
३१ ऑगस्ट पुन्हाएमएसईबीच्या १३२ केव्हीच्या कामासाठी सिंभोरा येथील वीजपुरवठा बंद होता.
सप्टेंबर१३२केव्हीची लाइन टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे वीज खंडित असल्याने नळाला पाणी आले नाही.