आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृत’मुळे एक दिवसाआड पाणी, अमरावती महानगरपालिकेत पाणी पुरवठा योजनेचा आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमृत योजनेतील कामे पूर्ण होई पर्यंत शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पाणी पुरवठ्याचा आढावा महापालिकेत घेण्यात आल्यानंतर मजीप्राच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती सोमवारी (४ सप्टेंबर) देण्यात आली. 
 
अमरावती शहर वर्ग महापालिका असून सद्यस्थितीत लोकसंख्या अंदाजे लाख आहे. अप्पर वर्धा धरणातून १९९४ मध्ये शहर पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. २०१६ मधील लोकसंख्या संकल्पीत धरुन १२० लीटर प्रतीमानसी प्रती दिन प्रमाणे करण्यात आले होते. मूळ संकल्पनामध्ये जलशुद्धीकरण केंद्र पपींग मशिनरी २००१ च्या लोकसंख्येकरीता संकल्पीत होते. मात्र शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत असल्याने या योजनेतील पपींग मशीन, जलशुद्धीकरण केंद्र साठवण टाक्या अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे शहरास नियमित पाणी पुरवठा योग्य दाबाने वेळेत करण्याकरीता मजीप्रास मागील ३वर्षांपासून अडचणी येत असल्याचे मजीप्रा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

अप्पर वर्धा धरणामध्ये पिण्याच्या पाण्याकरीता वार्षिक मंजूर आरक्षण ५८.०० दलघमी इतके आहे. २०१७-१८ मधील मंजूर पाणी आरक्षण ४४.०० दलघमी आहे. यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे धरणाच्या पाण्याची पातळी कमी तसेच पुढील काळात अपेक्षित पर्जन्यमान झाल्यास धरणाची पातळी कमी झाल्यास पंपाची उपसा क्षमता कमी होईल. परिणामी शहरास कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. वीज पुरवठ्यात खंड पडल्यास संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. सिंभोरा येथे २४ तास पंपींग करुन शहराची ताण सद्यस्थितीत भागविली जात आहे. 
शहराची लोकसंख्या लाखाच्या आसपास असून प्रती मानसी १३५ लीटर प्रमाणे दररोज पाण्याची मागणी १२७ दश लक्ष लिटर्स इतकी आहे. उपलब्ध ९५.०० दलघमी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून ११० ते १२५ दलली प्रतिदीन इतका पाणी पुरवठा होत आहे. शहराच्या उंच सखल भागामुळे गुरुत्वावर आधारित योजना असल्याने संपूर्ण शहरात सम प्रमाणात पाणी पुरवठा योग्य दाबाने वितरण करणे शक्य होत नाही. 
 
शहराच्या उंचावरील भागात पाणी पुरवठा योग्य दाबाने होत नसल्याने नागरिकांना रात्री पाणी पुरवठा करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून अमृत योजनेतून ६१.०० दलघमी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधणे, ११ नवीन पाण्याच्या नवीन टाक्या बांधणे, सिंभोरा येथे नवीन पंपींग मशिनरी, जुन्या पाईप लाइन बदलविणे नवीन भागाकरीता वाढीव वितरण पाइपलाइन टाकणे आदी कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 
महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आयुक्त हेमंत पवार, सभागृह नेता सुनील काळे, गटनेता प्रशांत वानखडे, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, मजीप्रा कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, उपविभागी अभियंता वसंत मस्करे, किशोर रघुवंशी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...