आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामासाठी जीवन प्राधिकरणचे पाणी कंत्राटदाराला "फुकटात'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मजीप्राच्या सिंबोरा ते अमरावती या मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी कंत्राटदाराला मजीप्राने हजारो लीटर फुकटचे पाणी 'आंदण' दिल्याची गंभीर बाब सोमवारी माजी खासदार अनंतराव गुढे यांनी उजेडात आणली. दरम्यान, या प्रकाराबद्दल मजीप्राचे वरीष्ठ अधिकारीसुध्दा अंधारात असल्याचे लक्षात आले.
नांदगाव पेठ ते माहुली जहागीर मार्गादरम्यान एमआयडीसीच्या एका रस्त्याचे काम सुरू आहे. मजीप्राची अप्पर वर्धा धरणावरून अमरावतीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एमआयडीसीच्या या रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी या रस्त्याच्या खाली टाकण्यात येणार आहे. हे काम मजीप्राच्याच वतीने करण्यात येत असून या कामासाठी मजीप्राने एक कंत्राटदार नेमला आहे. या कामासाठी कंत्राटदाराने मजीप्राच्या सिंबोरा ते अमरावती या मुख्य जलवाहिनीवरील एका 'एअर व्हॉल्व'वरून थेट पाइपद्वारे पाणी घेऊन बांधकाम सुरू केले आहे. या ठिकाणी मागील अनेक दिवसांपासून काम सुरू आहे आणि ज्या दिवशी काम सुरू राहते त्यादिवशी सुमारे पाच ते सहा हजार लीटर पाणी वापरले जाते. यावर माजी खासदार गुढे यांनी जाब विचारला होता. त्यावर कंत्राटदाराला मौखिक परवानगी दिली असून त्याचे देयक काढण्याच्या वेळी आम्ही त्याच्याकडून वापरलेल्या पाण्याचा पैसा 'फ्लॅट' दराने कापून घेऊ, असे वेळ मारून नेणारे उत्तर मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

याच विषयाबाबत सोमवारी माजी खासदार गुढे, नितीन हटवार अन्य शिवसेनेचे पदाधिकारी मजीप्राच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याकडे गेलेे. त्यामुळे मजीप्राचे उपविभागीय अभियंता किशोर रघुवंशी, उप कार्यकारी अभियंता बक्षी अन्य अधिकाऱ्यांचे पथक बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी हा गैरप्रकार समोर आला.

^मुख्य जलवाहिनीवरून मजीप्राच्याच कामासाठी एक कंत्राटदार दररोज हजारो लीटर पाणी वापरत आहे. हे पाणी घेण्यासाठी त्याने थेट 'एअर व्हॉल्व'वरून कनेक्शन घेतले आहे. मजीप्राने त्याला परवानगी दिलेली नाही. किंवा अधिकृत नळजोडणीही दिलेली नाही. याचाच अर्थ कंत्राटदार चोरून पाणी घेत आहे. पण मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्या कंत्राटदाराविरुद्ध काहीही कारवाई केली नाही. -अनंतराव गुढे,माजीखासदार

पाणीपुरवठा मंत्र्यांकडे तक्रार करणार
वापरलेल्या पाण्याचा पैसा वसूल करणार

^जेकामसुरू आहे, ते मजीप्राचेच आहे. कंत्राटदाराला आम्हीच पाणी वापरासाठी परवानगी दिली आहे. "पाण्याची चोरी' हाेत नाही. यातही त्या कंत्राटदाराला कामाचे देयक अद्याप दिलेले नाही, ज्यावेळी कामाचे देयक देऊ त्यावेळी वापरलेल्या पाण्याचे फ्लॅट दराने पैसे कापून घेऊ. काम सुरू असते, तेव्हा पाणी वापरले जाते. किशोर रघुवंशी, मजीप्रा.

अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवले
^जेथे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहे. पाहणीअंती नेमका प्रकार ते आम्हाला सांगतील. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षकअभियंता, मजीप्रा.

बातम्या आणखी आहेत...