आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद; नागरिकांचे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्यामुळे पाण्यावाचून एक क्षणही भागत नाही, असे असताना मजीप्राने मंगळवारी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला. काही दिवसांपूर्वी आठवडाभर नियमित पाणीपुरवठा होणार असे घोषित केल्यामुळे बहुतांश नागरिकांनी सोमवारी पाण्याची साठवणूक केली नव्हती. त्यामुळे मंगळवारी शहरातील अनेक भागात पाण्यासाठी लोकांचे बेहाल झाले. मंगळवारी सकाळी सुरू झालेले मजीप्राचे काम रात्री १२ नंतरही सुरूच राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारीही शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे लोक चांगलेच वैतागले. गृहिणी, मुलांसह घरातील सर्वजण कुठे पाणी मिळते काय याचा शोध घेत होते. काहींच्या घरी तर पिण्यासाठीच काय पण, स्वयंपाकापुरतेही पाणी नव्हते. त्यामुळे परिसरातील विहिरींवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली होती.
शेजाऱ्यांना तुझ्याकडे एक गंुड पाणी आहे काय, असे गृहिणी विचारीत होत्या.एक दिवस पाणी बंद राहणार म्हणून सांगितले जाते मात्र दोन-दोन दिवस पाणी येत नाही. आमच्या सहनशक्तीचा असा अंत पाहणे योग्य नव्हे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

दुरुस्ती कार्यामुळे बंद होता पाणीपुरवठा
^मंगळवारी रात्रीउशिरा पर्यंत दुरुस्तीचे काम सुरू राहिल्यामुळे बुधवारी सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सध्या टाक्या भरण्याचे काम सुरू आहे. मात्र ज्या भागात बुधवारी सकाळी पाणी मिळाले नाही त्या भागात थोडे उशिरा पाणी सोडले जाईल. जेथे सायं. पाणीपुरवठा केला जातो तेथे नेहमीपेक्षा उशिरा पाणी मिळेल. प्रशांत भामरे, अधीक्षकअभियंता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,अमरावती.