आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३३ वर्षे जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याची ‘मदार’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचा विस्तार झपाट्याने वाढला तरी पाणीपुरवठ्याची मदार मात्र, ३३ वर्षे जुन्या जलवाहिनीवर अवलंबून असल्याने शहरात अपुरा पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कालमर्यादा संपलेल्या जलवाहिनीतून ४३ टक्के पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे शहराला घोट घोट पाणी मिळत अाहे. शिवाय आरक्षित कोट्यापैकी ७५ टक्केच पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मागणी वाढूनही केवळ दीड ते दोन तासच पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
अप्पर वर्धा जलाशयात अमरावती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ५८.४७४ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. शहराला प्रत्येक दिवशी १२० दलघमी पाणीपुरवठा केल्या जात अाहे. याआधारे आरक्षित कोट्यापैकी ४३.८० दलघमी म्हणजेच ७५ टक्के एवढ्याच पाण्याचा वापर होत आहे. आरक्षित पाण्याचा शंभर टक्के वापर होत नसल्याने शहराला दोन तासांपेक्षा अधिक वेळ पाणीपुरवठा करणे शक्य असताना मजीप्राकडून कपातीचे धोरण अवलंबल्या जात आहे. मजीप्राच्या या धोरणामुळे शहरातील नागरिकांवर पाणीसंकट कोसळत आहे. सर्वच भागांत दीड ते दोन तास पाणीपुरवठा होत असून, तो अपुरा पडत आहे. दोन तास पाणीपुरवठा, त्यात दाब कमी राहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी पोहोचत नसल्याचे चित्र आहे. कमी दाबामुळे अनेकांच्या घरांतील उंचावरील टाकीमध्ये पाणी शिरत नाही. शहरातील नागरिकांना पाणी कधी येईल, याची वाट पाहण्याची वेळ आली आहे. अमरावती महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९८३ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबवली जात आहे. सुमारे ८० हजार ग्राहक असून, योजनेची व्याप्ती ६० टक्के घरांमध्ये आहे.

अमृत योजनेत योग्य नियोजन
^शहरातील पाइप लाइन२२ वर्षे जुनी आहे. अतिरिक्त पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने तिची क्षमता टिकणार नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दोन तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा करणे शक्य नाही. लोकसंख्येच्या आधारावर अमृत योजनेत योग्य नियोजन करण्यात आले आहे. ही योजना अमलात आल्यानंतर पाण्याची समस्या मिटेल. श्वेता बनर्जी, अधीक्षकअभियंता, मजीप्रा.

४३ % पाणी गळती
शहरातील काही पाइपलाइन ३० वर्षांपेक्षा जुनी असल्याने त्यातून ४३ टक्के पाणी गळती होत आहे. जुन्या पाइपलाइनची लांबी २०० कि.मी.च्या आसपास आहे. पाणी गळतीची गंभीर बाब लक्षात घेता त्यामधील १९२ कि.मी. पाइपलाइन बदलणे अत्यंत गरजेचे आहे.