आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत आॅगस्टमध्येच पाणीटंचाई, पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात मर्यादित साठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यंदा पुरेसा पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात केवळ ४३.४० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे संभाव्य जलसंकट लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
 
कारण अशा स्थितीमध्ये अमरावती शहर आणि बडनेराला दररोज पूर्ण दाबाने पाणीपुरवठा शक्य नसल्याचे सांगून मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी आॅगस्टमध्येच पाणीटंचाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात अमरावतीकरांना पाण्याचा जपून आणि कटकसरीने वापर करावा लागणार आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मनपा, मजीप्रा आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. बुधवारी मनपा आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी एक दिवसाआड पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. एकाचवेळी बडनेरा अमरावतीला पाणी पुरवठा होत असल्याने सध्या पाण्याच्या टाक्यांवरील ताण वाढला असून कमी दाबाने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे मजीप्राने स्पष्ट केले आहे. 
 
यंदा पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर असल्याने महापौर, मनपा आयुक्तांशी चर्चा केली. पूर्ण दाबाने जर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तर मग आठवड्यातून एक दिवस नळ बंद ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकच भागात आठवड्यातून चार दिवस पाणी मिळेल. पाटबंधारे विभागाने या गहन प्रश्नावर तातडीने बैठक घेण्याची हमी दिली आहे. त्यानंतरच एक दिवसआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होईल. यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागेल, अशी माहितीही मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. 
 
टिल्लू पंप करणार जप्त 
वसुली पथकच पंपाने पाणी ओढणाऱ्यांकडे लक्ष देणार आहे. जर कोणी पंपाने पाणी ओढत असल्याचे दिसले तर त्याचा पंप जप्त करून त्याला ताकीद दिली जाईल. यानंतरही त्याने ऐकले नाही तर त्याचा दुसरा पंपही जप्त करून कनेक्शन कापले जाईल तसेच त्याच्याकडून दंडही वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अवैध मार्गाचा अवलंब करु नये,असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...