आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृता’साठी १५० कि.मी.लांबीची नवीन पाइपलाइन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता वाढीव पाणीपुरवठ्यासाठी विस्तारित भागामध्ये १५० कि.मी. लांबीची नवीन पाइपलाइन टाकली जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १५६ दशलक्षलीटर क्षमतेची संकल्पित १४५ कोटी रुपयांची ही योजना तयार केली असून, अमृत अभियानातून साकारण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
अमरावती महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९८३ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येत आहे. सुमारे ८० हजार ग्राहक असून, योजनेची व्याप्ती ६० टक्के घरांमध्ये आहे. ३३ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योजनेचे संकल्पित वर्ष २०११ होते. त्यामुळे शहराचा विस्तार लक्षात घेता सद्य:स्थितीत योजना अपुरी पडत आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्यात आल्याने प्रती माणशी १३५ लीटर प्रती दिन पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या योजनेतील पंपगृह, अशुद्ध शुद्ध पाण्याची दाबनलिका, गुरुत्वनलिका तसेच वितरण नलिका ही कामे १५६ दशलक्षलीटर क्षमतेकरिता संकल्पित करण्यात आली आहे.

शहरातील काही पाइपलाइन ३० वर्षांपेक्षा जुनी असल्याने त्यातून ४३ टक्के पाणी गळती होत आहे. त्यामुळे त्यामधील १९२ कि.मी. पाइपलाइनदेखील बदलली जाणार आहे. अस्तित्वात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची पूर्ण क्षमता उपयोगात येत असल्याने वाढीव लोकसंख्येसाठी तातडीने ६१ दशलक्षलीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याची गरज आहे. शिवाय जुन्या जलशुद्धीकरण केंद्राचीदेखील दुरुस्ती करावी लागणार आहे. सद्य:स्थितीत असलेल्या साठवण टाक्या अपुऱ्या पडत असल्याने या योजनेत उंच जमिनीवरील टाक्यांचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. या योजनेचे अंदाजपत्रक संकल्पचित्र तयार करण्यात आले असून, अधीक्षक अभियंता मध्यवर्ती नियोजन संनियंत्रण कक्ष ठाणे यांना सादर करण्यात आले आहे. यात काही मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने त्याअनुषंगाने डीपीआरमध्ये बदल करीत पुन्हा सादर केल्या जाणार आहे. हा विषय महापालिकेच्या शनिवार, १९ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला हाेता. शहराची वाढीव पाणीपुरवठ्याची गरज लक्षात घेता सर्वसाधारण सभेने या विषयाला मान्यता दिली आहे.

योजनेचीसद्य:स्थिती : सिंभोरायेथील उर्ध्व वर्धा धरणातून ९५ दशलक्षलीटर क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरात उभारण्यात आलेल्या जमिनीवरील १३ उंच टाक्यांद्वारे शहरातील सुमारे ९५० कि.मी. पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या टाक्यांची एकूण क्षमता २९.७५ दशलक्षलीटर आहे. शहरात ८० हजार खासगी, तर १,२०० सार्वजनिक नळ आहेत.

स्था. स्व. सं. हिस्सा २५ %
वित्तीय आकृतिबंध
केंद्रशासन हिस्सा ५० %
राज्य शासन हिस्सा २५ %
१५६ दशलक्षलीटर क्षमतेचा प्रकल्प
६१ दशलक्षलीटरचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र
१९२ कि.मी. ची जुनी पाइपलाइनदेखील बदलणार

पुढे काय?
शहराचाविस्तारित भाग तसेच अस्तित्वात योजनेत दुरुस्तीसाठी अमृत योजनेतून १४५ कोटी रुपयांचा प्रस्तावाला शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. शासनाची मंजुरी मिळताच दोन टप्प्यांत ही कामे केली जाईल. त्यामुळे शहरातील नागरिकांची तहान भागेल.

विस्तारित भागांना मिळेल पाणी
^शहरातील विस्तारितभागात पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील नव्या भागात ही पाइपलाइन टाकली जाईल. अमृत योजनेला मनपाने मंजुरी दिली. शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून,लवकरच बैठक होणार आहे. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त,महापालिका.

२.२८ कोटींची लोकवर्गणी
महापालिकेच्या हिश्शाचा निधी मजीप्रा उभारणार असून, यात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला देत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रमाणात २.२८ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. लोकवर्गणीतून प्राप्त झालेले २.२८ कोटी रुपये मजीप्राकडे जमा करण्यात आले आहे. उर्वरित लोकवर्गणी लाभार्थी ग्राहकांकडून गोळा केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...