आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी युवकावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांद्रा फाट्याजवळ वाहनाच्या धडकेने अपघातग्रस्त झालेली दुचाकी. - Divya Marathi
नांद्रा फाट्याजवळ वाहनाच्या धडकेने अपघातग्रस्त झालेली दुचाकी.
मेहकर- तालुक्यातील हिवरा आश्रम येथील मित्राला भेटून परतीच्या प्रवासाला निघालेल्या एका २६ वर्षीय युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नांद्रा फाट्याजवळ घडली. विशेष म्हणजे या अपघातातील मृतक युवकाचे मे रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातल्यामुळे पाचला गावात एकच शोककळा पसरली आहे. 
 
तालुक्यातील पाचला येथील सिद्धार्थ यशवंत गवई (वय २६) याचे मे रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव येथील एका मुलीशी लग्न झाले होते. संसाराची सुखी स्वप्ने पाहत असतानाच मे राेजी हिवरा आश्रम येथे मित्राला भेटण्यासाठी (एम.एच. ०४/ ईआर/ २५९२) या क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. मित्राला भेटून तो परत पाचला येथे जाण्यासाठी निघाला होता. नांद्रा फाट्याजवळ येताच त्याच्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाचे जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, अज्ञात वाहनाने त्याच्यासह दुचाकीला दहा ते पंधरा फुटापर्यत फरफटत नेले होते. 
 
या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघात घडताच अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच असंख्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नव विवाहित युवकावर काळाने झडप घातल्यामुळे पाचला गावात एकच शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्र अपघाताचा गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे. दुचाकीला जबर धडक देणारा तो अज्ञात वाहनचालक कोण?, याचा शोध पोलिस घेत आहेत, असे तपासी पोलिस अधिकारी म्हणाले. दरम्यान, लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या या तरुणाचा लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याचा दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने पाचला या गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...