आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरंभी येथील बकरा चक्क चहा पितो तेव्हा, नागरिक अचंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राणीमित्र जयकुमार राठोड यांच्या हस्ते चहा पितांना बकरा. - Divya Marathi
प्राणीमित्र जयकुमार राठोड यांच्या हस्ते चहा पितांना बकरा.
दिग्रस - चहाहा पेय सर्वपरिचित असून त्याला काही नागरिकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व देखील आहे. बहुतांश लोकांचा चहाशिवाय दिवसच उजाडत नाही. मात्र याच चहाने तालुक्यातील आरंभी येथील एका बोकड्याला चक्क भुरळ घातली असून, या प्रकारामुळे गाववासीयांनी तोंडात बोटे घातली आहे.
आरंभी येथील पक्षी आणि प्राणीमित्र जयकुमार प्रकाश राठोड यांच्याकडे वास्तव्याला असलेल्या अर्जुन नामक बकऱ्याला चहाची लत लागली आहे. चहाची चुश्की घेतल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. जयकुमार राठोड या प्राणीमित्र तरुणाचा पशुपक्षी आणि प्राण्यांशी बालपणापासूनच लळा आहे.त्यांच्या सोबत खेळणे, बागडणे, अंघोळ घालणे, मस्करी करणे, शिस्त लावणे, त्यांची व्यवस्था आणि देखभाल करणे इत्यादी कार्ये तो समर्पण या भावनेतुन करत असतो. म्हणूनच त्याच्याकडे कुत्रा, मांजर, बकरीचे पिल्लू, गाय इत्यादी पाळीव प्राणी आहेत. त्याच्या घराच्या अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट नेहमीचा असतो. यांमधून अर्जुन नामक बकरा त्याच्या अंगावर जरा जास्तच राहतो. सकाळी उठल्यापासून थेट रात्री होईपर्यंत अर्जुन चहाची वाट आतुरतेने बघत असतो. हा बोकुड चहा नेमका कोणत्या कारणांमुळे पितो, हा संशोधनाचा विषय आहे. गोल्डीबाबा आणि ब्रूक बॉन्ड या पत्तीचा चहा त्याला विशेष करून आवडते. या आकाशवाणीचा विषय ठरलेला हा बकरा चर्चेचा विषय ठरत आहे.

तरीही दक्षता बाळगतो: मलाबालपणापासूनच पशुपक्षी,प्राण्यांशी स्नेह आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून माझं कार्य चालू आहे. बकऱ्याला चहाची आवड असली तरी चहामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून दक्षता ही बाळगतो,असे जयकुमार राठोड यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...