अमरावतीमध्ये पांढ-या रंगाचा लायकोडोन साप आढळला आहे. गवतात भागात राहणारा हा साप हिरव्या रंगाचा असतो, मात्र रंगद्रव्य निश्चित करणा-या पेशींमध्ये जनुकीय बदलांमुळे या सापाचा रंग विकसीत होऊ शकला नाही. त्यामुळे हा अलबिनो प्रकारातील साप आहे. असा साप अत्यंत दुर्मिळ असल्याचे स्थानिक सर्पमित्रांचे मत आहे. या सापाच्या शरीरावर उंचवटे असलेले खरखरीत खवले असतात. मार्च ते जून महिन्याचा कालावधी हा या सापांचा प्रजननाचा काळ आहे. स्थानिक सर्प अभ्यासक निलेश कंचनपुरे यांनी या सापाविषयी माहिती दिली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, दुर्मिळ सापाची फोटो..