आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होलसेल गुटखा विक्रेते ‘महसूल’च्या रडारवर, जिल्हाधिकाऱ्यांना ‘एफडीए’च्या अहवालाची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महसूल विभागाने चार दिवसांपूर्वी अन्न, औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाला सोबत घेऊन जाफरजीन प्लॉटमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त करून तो नष्ट केला. एकाच ठिकाणाहून महसूल विभागाने सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त केल्याने अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यामुळे आता शहरासह जिल्ह्यातील सर्वच होलसेल गुटखा विक्रेते महसूल विभागाच्या रडारवर असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले आहे.
शहरातून एकाचवेळी एकाच ठिकाणाहून दोन व्यावसायिकाकडून तब्बल कोट्यवधींचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. गुटखा विक्री किंवा मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्याचे काम एफडीएचे आहे. असे असले तरी नुकतीच महसूल विभागाच्या पुढाकाराने झालेली गुटखा कारवाई एफडीए किती ‘गंभीरपणे’ आपली जबाबदारी पार पाडत आहे, हे दाखवून देत आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचा विस्तृत अहवाल मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर शहरातील गुटखा विक्रीचे जाळे साठ्याची व्यापकता समोर आली आहे. शहरात अजूनही गुटखा साठा असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकापुढे येत आहे, त्याबाबत माहिती काढण्याचे काम महसूलच्या पथकांनी गोपनीय पद्धतीने सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच अन्य गुटखा साठा बाहेर येण्याची शक्यता आहे.

‘ब्रेव्होरेव्हूनी टिम’ : जिल्ह्यातअनेक दिवसांपासून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे.याबाबत पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार सुरेश बगळे यांना याबाबत कारवाईचे आदेश दिले होते.ही कारवाईची जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

कारवाई सुरूच
^शहरात अजूनही गुटखा साठा आहे का? याबाबत आम्ही शोध घेत आहोत, आमचे पथक त्यासाठी काम करत आहे. गुटखा साठा आढळताच आमच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. सुरेशबगळे, तहसीलदार,अमरावती.

‘एफडीए’ने अद्याप अहवाल दिला नाही
^या कारवाईचा विस्तृत अहवाल आम्ही ‘एफडीए’ला मागितला आहे. मात्र शनिवारी सायंकाळपर्यंत अहवाल आम्हाला प्राप्त झाला नव्हता. हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...