आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून; पतीला झाली 7 वर्षांची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यावर वार करून तिचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने 7 वर्षांची शिक्षा हजार रुपये दंड, दंड भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मोतीलाल हिराजी कासदेकर (६५) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी मृतक फुलकाय कासदेकर (५५) हे नात्याने पती पत्नी होते. मे २०१५ मध्ये क्षुल्लक घरगुती वादातून आरोपीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर काठीने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले होते. या हल्ल्यात ती गतप्राण झाली होती. या प्रकरणी चंदुलाल गाणू बेलसरे रा. सलोना याच्या तक्ररीवरून पोलिसांनी आरोपी मोतीलाल कासदेकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.पोलिस निरीक्षक एन. एम. गवारे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. न्यायालयाने एकूण ११ आरोपींच्या साक्ष तपासल्या. आरोपीचा दोष सिद्ध झाल्याने त्याला वर्षांची शिक्षा हजार रुपये दंड, दंड भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

सरकारी वकील म्हणून डी. आर. चव्हाण यांनी काम पाहिले. पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण कांबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद डहाके, अविनाश देशमुख, प्रकाश काळे यांनी कामगिरी पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...