आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: वेगळ्या विदर्भाच्‍या मागणीला शिवसेनेचा विरोध, सत्‍ताधारी आमनेसामने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सोमवारपासून सुरू झालेल्‍या हिवाळी अधिवेशनामध्‍ये वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्‍या पहिल्‍याच दिवशी विधानभवन परिसरात सत्‍ताधारी शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले. राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हकालपट्टीची मागणी करत शिवसेनेच्‍या आमदारांनी विधानभवनाच्या आवार घोषणांनी दणाणून सोडला. आमदारांनी यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा दिल्‍या आहेत. त्‍यामुळे विरोधक बाजूला राहून सत्‍ताधारी शिवसेना-भाजप यांच्‍यातच जुंपली.
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर जनमतचाचणी घेण्‍यात यावी, असा सल्ला रविवारी दिला होता. जनमतचाचणी घेतल्यास 80 टक्के जनता ही वेगळ्या विदर्भाच्याच बाजूने कौल देईल असा दावाही त्‍यांनी केला होता. त्‍यानंतर अणे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारीही दिवसभर याच मुद्द्यावरून राजकारण तापण्‍याची शक्‍यता आहे. श्रीहरी अणे यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक मत आहे, याप्रश्नी राज्याचीच बाजू मांडू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले होते. दरम्‍यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विदर्भवादी अणे यांची नियुक्‍ती महाधिवक्‍तापदी होतेच कशी असा सवाल करत, फडणवीस आणि अणे यांची मैत्री असल्‍याचे म्‍हटले आहे.
45 व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्‍या वतीने सोमवारी विधानभवनात 45 व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ करण्‍यात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार ॲड. आशिष शेलार, उल्हास पवार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी यावेळी उपस्‍थित होते.
विधानभवनाच्‍या आवारात..
- शिवसेनेने केला वेगळ्या विदर्भाच्‍या मागणीचा निषेध.
- विधानभवनाच्‍या परिसरात झळकावले अणे यांच्‍या राजीनाम्‍याच्‍या पाट्या.
- संयुक्त महाराष्ट्राच्‍या घोषणांनी दणाणला परिसर.
- काही भाजप आमदारांनी दिल्‍या वेगळ्या विदर्भाच्‍या घोषणा.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा विधानभवन बाहेरील शिवसैनिकांचे फोटो, वाचा..
अणेंच्‍या बचावासाठी तावडे मैदानात..
मुख्‍यमंत्री फडणविस काय म्‍हणाले..
काय म्‍हणाले विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे..