आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या मदतीने केला पत्नीने पतीचा खून, घर नावावर करून देण्यासाठी तगादा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील लालखडी भागात राहणाऱ्या साबिर शहा सिकंदर शहा (३२) यांचा गुरूवारी रात्री खुन झाला होता. हा खुन त्यांच्या पत्नीने भाऊ, नातेवाईकाच्या मदतीने केल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. घर नावावर करून द्यावे, यासाठी पत्नीनेच पतीला संपविल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना शुक्रवारी १३ जानेवारीला अटक केली. 

मो. अलीम मो. अकबर (२६ रा. हैदरपुरा), अनिस खान ऊर्फ ख्वाजा यूनुस खान (२५, रा. कलीमनगर, अमरावती) या दोघांना नागपूरी गेट पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. साबिर शहा सिकंदर शहाचा ते महिन्यांपुर्वी निकाह झाला होता. दरम्यान काही दिवसांपासून त्याचा त्याच्या पत्नीचा वाद सुरू होता. राहते घर माझ्या नावे करून दे, यावरून त्या पती पत्नीचा वाद होता, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पती साबिर शहा घर नावावर करून देण्यासाठी तयार नव्हता म्हणून त्याच्या पत्नीने तीचा भाऊ मो. अलीम याला सांगितले. 
 
त्यामुळे गुरूवारी १२ जानेवारीला रात्री मो. अलीम, ख्वाजा साबिरची पत्नी या तिघांनी साबिरचा खुन केला. खुन झाल्यानंतर मो. अलीम ख्वाजा घटनास्थळावरून पसार झाले तर पतीचा कोणीतरी खुन केला, असे सांगत त्याची पत्नी नागपूरी गेट ठाण्यात पोहचली. मात्र पोलिसांना तीच्यावर संशय आल्यामुळे पोलिसांनी तीची कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबूली देत दोघांचा समावेश असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच शुक्रवारी पोलिसांनी साबिरच्या पत्नीला अटक केली होती. पसार असलेल्या मो. अलीम अनिस खानचा शोध सुरू होता. त्या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केली. अशी माहीती नागपूरी गेटचे ठाणेदार शिवा भगत यांनी दिली आहे.