आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने जुन्या वादावरून ऑटोचालकावर केला अॅसिडचा हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पुरुषाकडून महिलेवर अॅसिड फेकल्याच्या घटना आजवर अनेकदा घडल्या आहेत. परंतु, बुधवारी रात्री एका महिलेने जुन्या वादावरून ऑटोचालकाच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत माधोगडिया मार्गावरील गौतमनगरात घडली. या घटनेत रवींद्र कीर्तकार (४०) यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, माधुरी शेकार (३२, गौतमनगर) असे अॅसिड हल्ला केलेल्या महिलेचे नाव आहे. ऑटोचालक सदर महिलेची जुनी आेळख आहे. जुने वादावरून सदर महिलेने रवींद्र यांच्यावर हा अॅसिड हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली.