आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवविवाहितेने माहेरी घेतला गळफास, अमरावतीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एका शासकीय अधिकाऱ्याच्या एकुलत्या एक २५ वर्षीय उच्चशिक्षित नवविवाहित मुलीने गुरूवारी (दि. १८) रात्री वडिलांच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने मृत्यूनंतर शरीर अवयव दानाची इच्छा व्यक्त केली. मात्र गळफास घेऊन मृत्यू असल्यामुळे डॉक्टरांनी अवयव घेण्यास नकार दिला. तसेच माझ्या पतीने मला शेवटचा ‘सिंदूर’ लावावा, अशा भावनिक शब्दात स्नेहलने चिठ्ठी लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्नेहल दिपेश पूरकर (२५ रा. कल्याण) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे. स्नेहल ही शहरातील ललित कॉलनीमध्ये राहणाऱ्या रवींद्र नारायणराव नांदूरकर यांची एकुलती एक मुलगी हाेती. साडेसात महिन्यांपूर्वी स्नेहलचा विवाह कल्याण येथील दीपेश यांच्यासोबत झाला. सद्या स्नेहल ही माहेरी होती. गुरूवारी सायंकाळी बेडरुममध्ये स्नेहलने गळफास लावला. असे काय घडले की, स्नहेलने हा टाेकाचा निर्णय घेतला? याचा फ्रेजरपुरा पोलिस शोध घेत आहे.
बातम्या आणखी आहेत...