आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डफरीनमध्ये कोसळून रूग्ण महिलेचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंजनगावसुर्जी येथे राहणारी एक ३० वर्षीय महीला रविवारी चार सप्टेंबरला उपचारासाठी डफरीन रुग्णालयात दाखल झाली होती. दरम्यान सोमवारी चार सप्टेंबरला ती कोसळली. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला.

रिजवाना बानो वारीस बेग (३०, आजीसपुरा, अंजनगाव सुर्जी) असे मृतक महीलेचे नाव आहे. रिजवाना बानो यांचा घरीच गर्भपात झाला होता. मात्र त्यानंतर रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना रविवारी डफरीन रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान सोमवारी रिजवाना बानो या झोपेतून उठल्या, त्याचवेळी त्या खाली कोसळल्या, यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस डफरीनमध्ये पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेनासाठी इर्विनमध्ये आणला, त्यावेळी नातेवाईकांनी रोष व्यक्त करून शवविच्छेदनासाठी विरोध केला, मात्र त्यानंतर शवविच्छेदन केले. अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
बातम्या आणखी आहेत...