आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चिमुकल्यांसह महिलेने घेतली रेल्वेतून उडी; तिघेही गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील संजय गांधीनगरमध्ये राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने शनिवारी उशिरा रात्री बडनेरा ते अकोला रेल्वे मार्गादरम्यान रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच तिघांनाही गंभीर अवस्थेत इर्विन इर्विनमधून नागपूरला उपचारासाठी रवाना केले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी महिलेविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

आम्रपाली सुनील बन्सोड (३०), प्रथमेश सुनील बन्सोड (३) आणि प्रियंका ऊर्फ प्राजक्ता सुनील बन्सोड (दीड वर्ष, सर्व रा. संजय गांधीनगर, अमरावती) असे जखमींचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अकोला ते बडनेरा रेल्वे मार्गावरील कुरूम रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर एक व्यक्ती रेल्वे रुळावर पडल्याचे अकोल्याकडे जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाला दिसले. त्यामुळे चालकाने ही माहिती कुरूम रेल्वेस्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना पाठवले. त्यावेळी एक महिला तिच्या बाजूलाच दोन मुलं गंभीर अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. घटनास्थळावर पोहोचलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही माहिती कुरूम रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यामुळे त्यांनी अकोल्याकडून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या भुसावळ वर्धा पॅसेंजरला घटनास्थळी थांबवून तिन्ही जखमींना तातडीने बडनेराला पाठवले. 

बडनेरावरून पोलिस रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिघांनाही रविवार, ऑक्टोबरला पहाटे इर्विन रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात काही वेळ उपचार झाल्यानंतर महिलेने स्वत:चे नाव आम्रपाली सांगितले. त्यानंतर तिच्या घराचा शोध घेत कुटुंबीयांना माहिती दिली. तिघांचीही प्रकृती समाधानकारक नसल्यामुळे त्यांना नागपूरला रवाना केले आहे. हे घटनास्थळ अकोला जीआरपी पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे बडनेरा जीआरपी पोलिसांनी हे प्रकरण अकोला जीआरपी पोलिसांकडे वर्ग केले. या प्रकरणात अकोला जीआरपी पोलिसांनी आम्रपाली बन्सोडविरुद्ध कलम ३०७ तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

बडनेराजीआरपी पोलिसांनी हे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणात महिलेविरुद्ध कलम ३०७ ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेने उडी घेतल्यामुळे घटना घडल्याचे पुढे येत आहे. सखोल तपास करणार आहे. 
- एपीआय वानखडे, जीआरपी अकोला. 

हरवल्याची नोंद 
ही महिला दोन मुलं हरवल्याची तक्रार महिलेच्या पतीने शनिवार, ३० सप्टेंबरला दुपारी फ्रेजरपुरा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी ‘मिसिंग’ची नोंद केली असल्याचे ठाणेदार राहुल आठवले यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...