आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात महिला वकिलाचा दहावीच्या विद्यार्थ्याकडून स्टुडिअाेत घुसून निर्घृण खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या नागपुरातील अॅड. राजश्री टंडन यांचा पाठलाग करून अल्पवयीने मारेकऱ्याने खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सेमिनरी हिल्स परिसरात घडली. याप्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी मारेकऱ्यास ताब्यात घेतले असून तो दहावीचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

मृत अॅड. राजश्री टंडन या जिल्हा आणि उच्च न्यायालयात वकिली करायच्या. मारेकरी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी तडीपार केले होते. अॅड. टंडन यांच्या तक्रारीमुळेच अापल्या वडिलांवर तडीपारीची वेळ अाली असल्याचा या मुलाचा समज होता. त्यावरून टंडन आणि मुलाच्या कुटुंबात सातत्याने वाद होत होते. 

शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अॅड. टंडन या व्हेटर्नरी कॉलेजजवळून जात असताना त्यांचा अाराेपी मुलाशी वाद झाला. या वादातून त्याने चाकू काढून त्यांच्यावर उगारला. मात्र प्रसंगावधान राखत अॅड. टंडन या बचावासाठी तेथून धावतच निघाल्या. रस्त्यात असलेल्या एका फोटो स्टुडिअाेमध्ये त्यांनी आसरा घेतला. मात्र मारेकऱ्याने थेट फाेटाे स्टुडिअाेत घुसून अॅड. टंडन  यांच्या डोक्यावर चाकूचे घाव घालून त्यांना ठार केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर गिट्टी खदान पोलिसांनी मारेकरी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. अॅड. टंडन यांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बराच वावर होता. त्यांनी काही वर्षांपूर्वी एका आयपीएस अधिकाऱ्याशी विवाहदेखील केला होता. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूर दाैऱ्यावर अाले हाेते. ते शहरातून बाहेर पडून काही तास उलटत नाहीत ताेच कायदा- सुव्यवस्थेला अाव्हान देणारी ही घटना घडली. 
बातम्या आणखी आहेत...