आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाऊबाईवर गुन्हा दाखल; देराणीने जाचामुळे केली होती आत्महत्या, अमरावतीतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाली हलमारे पती गजानन हलमारे यांच्या विवाह सोहळ्यातील छायाचित्र. - Divya Marathi
वैशाली हलमारे पती गजानन हलमारे यांच्या विवाह सोहळ्यातील छायाचित्र.

धामणगाव रेल्वे - मोठ्या जाऊच्या जाचामुळे मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार पित्याने केल्यानंतर पिंपळखुटा येथील प्रियंका प्रफुल्ल हलमारे या जाऊबाई विरुद्ध मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आर्वी तालुक्यातील वाठोडा( पुनर्वसन) येथील शेतकरी मारोती मते यांना तीन मुली मुलगा आहे. मोलमजुरी शेतीवर पोट भरून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील गजानन हलमारे यांच्याशी दुसरी मुलगी वैशाली हिचा विवाह झाला होता. कालांतराने वैशालीला जाऊ प्रियंकाकडून माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्रास सुरू झाला. प्रियंका वैशालीचा मारहाण शिवीगाळ करून छळ करू लागली होती. संयुक्त कुटुंबात सासू सासरे,भासरे प्रफुल्ल पती गजानन असतानाही प्रियंका तिचा छळ करीत होती. त्यामुळे वैशालीने आर्थिक क्षमता नसताना पैसे आणून सासरकडील मंडळींना दिले होते. दोन वर्षांपूर्वी वैशालीने अपंग मुलीला जन्म दिल्याने प्रियंकाच्या जाचात वाढ झाली. तुला अपंग मुलगी आहे, तुला कधीही मूलबाळ होणार नाही असे म्हणून सातत्याने छळ करीत होती.


प्रियंका वैशालीचा छळ करताना म्हणत असे की, मी कोर्ट कचेऱ्या पहिल्या आहेत. माझ कोणी काही करू शकत नाही. मी माझ्या पतीला सोडत नाही तर तुला कसे सोडू. माहेरहून पैसा आणावाच लागेल. पती गजानन हलमारे त्याचे आईवडील एकत्र त्याच घरात गजाननचा मोठा भाऊ प्रफुल्ल पत्नी प्रियांका हलमारे विभक्त राहत होते. दिवाळी झाल्यावर आठ दिवसाने वैशालीचा पती गजानन याने तिला माहेरी सोडले. दोन दिवसांनी तिने वडिलांना ७० हजार रुपये मागितले ते कशासाठी हवेत ही विचारणा केली असता ही रक्कम जाऊ प्रियांका हिने मागितल्याचे उघडकीस आले. ही रक्कम आल्यास घरातील सर्व जण बाहेर गेल्यावर मी तुझें काय करते असे म्हणून जीवे मारण्याची धमकीही प्रियंकाने वैशालीला दिली. वैशालीने घरी वडिलांना कुटुंबाला या जाचाबद्दल माहितीही दिली होती. परंतु घरच्यांनी तिची समजूत काढून हिंमत देवून १४ नोव्हेंबरला भाऊ सुरज सोबत वैशालीला सासरी पिंपळखूटा येथे सोडून दिले. मात्र १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वैशालीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती वडिलांना माहेरच्या कुटुंबियांना कळली. दरम्यान वैशालीच्या वडीलांनी जाऊ प्रियंकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मंगरुळ दस्तगीर पोलिसात तक्रार दाखल केली. वैशालीच्या पित्याच्या तक्रारीवरून प्रियंका प्रफुल्ल हलमारे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...