आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्यासह महिलेने घेतली विहिरीत उडी, यवतमाळ येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- रक्षाबंधनाला माहेरी का नेले नाही, या कारणावरून एका महिलेने आपल्या एक वर्षीय चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतली. या घटनेत त्या एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना परवा पोलिस स्टेशन हद्दीतील वरूड भक्त येथे दि. १९ ऑगस्ट रोजी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. हर्षल प्रशांत राऊत वय १ वर्ष रा. वरूड भक्त असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पती प्रशांत रजनीकांत राऊत यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार दि. १९ रोजी प्रशांत याने आपल्या पत्नीला रक्षाबंधनाला माहेरी नेले नाही.त्यामुळे पत्नी राजश्री राऊत हिने गावातील विहिरीत एक वर्षीय चिमुकल्यासह उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विहिरीत बुडून एक वर्षीय चिमुकला हर्षल याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पारवा पोलिसांनी राजश्री राऊत या महिलेविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...